पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा!

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र उज्ज्वल प्रगती करेल असा मला विश्वास आहे. मन:पूर्वक शुभेच्छा.

  • Share this:

मुंबई 28 नोव्हेंबर : उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि महाराष्ट्रात नव्या राजकीय पर्वाला सुरूवात झाली. उद्धव यांनी शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र उज्ज्वल प्रगती करेल अशा शुभेच्छाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्या. पंतप्रधानांसोबतच अनेक नेत्यांनीही उद्धव यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. शिवाजी पार्कवर शिवशाहीच्या धर्तीवर प्रंचड व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. त्या व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरच्या शिवाजी महारांजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नमस्कार केला.

उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना आणि आई वडिलांना स्मरून शपथ घेतली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि चंद्रकांत पाटील हे या शपधविधी समारंभाला उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला देशभरातले दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, कपील सिब्बल, एम. के स्टॅलीन, शंकरसिंह वाघेला. यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. राज ठाकरे हे सहकुटूंब या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरली.

हा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्य अजेंडा

शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, लघू मध्यम आणि मोटे उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, सर्व जाती धर्म आणि प्रादेशिक विभाग, SC, ST, OBC धार्मिक आणि अल्पसंख्यांक सामाजिक गट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 07:34 PM IST

ताज्या बातम्या