भाषणादरम्यान काँग्रेस नेत्या जोरात हसल्या, मोदींनी लगावला 'रामायण' टोला

"रेणुका चौधरी यांना काही म्हणून नका, कारण रामायण मालिका संपल्यानंतर आज पहिल्यांदाच असं हसू ऐकायला मिळालं"

  • Share this:

07 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेनंतर राज्यसभेतलं भाषणही गाजलं. पण या भाषणादरम्यान काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांना हसू आवरले नाही. त्यावर मोदींनी रामायण मालिकेनंतर पहिल्यांदाच असं हसू ऐकायला मिळालं असा टोला लगावला.

राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान मोदी बोलत होते. त्यावेळी काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी या जोर जोरात हसल्यात. त्यांचं हे हसणं सभापती व्यंकय्या नायडू यांना खटकलं. व्यंकय्या नायडूंनी रेणुका चौधरी यांना हसू नये अशी तंबी दिली. तसंच पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान असं वागू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशाराही नायडूंनी दिला.

यावर पंतप्रधान मोदींनी, "रेणुका चौधरी यांना काही म्हणून नका, कारण रामायण मालिका संपल्यानंतर आज पहिल्यांदाच असं हसू ऐकायला मिळालं" असा टोला लगावला.

मोदींच्या शाब्दिक टोल्यानंतर सभागृहात एकच हश्शा पिकली. रेणुका चौधरी यांनी काही म्हणण्याचा प्रयत्न केला पण सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाल्यानंतर त्यांना शांत बसावे लागले.

First published: February 7, 2018, 7:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading