News18 Lokmat

अंदमान निकोबारमधल्या तीन बेटांचं नामकरण; पंतप्रधानांची घोषणा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 75 वर्षांपूर्वी याच बेटांवर तिरंगा फडकवला होता.

News18 Lokmat | Updated On: Dec 30, 2018 08:18 PM IST

अंदमान निकोबारमधल्या तीन बेटांचं नामकरण; पंतप्रधानांची घोषणा

पोर्ट ब्लेअर, 30 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी अंदमानातील सेल्युलर जेलला रविवारी भेट दिली. स्वातंत्रवीर सावरकरांना ज्या कोठडीत काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. त्या कोठडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्या कोठडीत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या छायाचित्रासमोर थोडावेळ ध्यान केलं आणि आदरांजली वाहिली. जेल परिसरात असलेल्या शहीद स्तंभावरही त्यांनी पुष्पचक्र वाहिलं आणि तेथील संग्रहालयाला भेट दिली.


यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी तीन बेटांच्या नामकरणाची घोषणा केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 75 वर्षांपूर्वी याच बेटांवर तिरंगा फडकवला होता. त्या वर्धापन दिनाच्या दिवशीच पंतप्रधानांनी ही घोषणा केली.


रॉस बेटाचं नाव बदलून 'नेताजी सुभाष चंद्र बोस' बेट असं करण्यात आलंय. 'नील' बेटाला शहीद बेट आणि हॅवलॉक बेटाला 'स्वराज' बेट असं नाव देण्यात आलंय. यावेळी पंतप्रधानांनी एक पोस्टाचं तिकिट, पाकिट आणि 75 रूपयांचं नवं नाणंही जारी केलं.

Loading...


त्याच बरोबर अंदमान आणि निकोबारला एका सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने एक विद्यापीठही उभारण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2018 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...