पंतप्रधान मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक, निकालांचे पडसाद उमटणार?

पंतप्रधान मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक, निकालांचे पडसाद उमटणार?

विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला नाकारलं तर लोकसभेत काय होणार याची धास्ती भाजपने घेतलीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल आणि उर्जित पटेल यांनी दिलेला राजीनामा या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत देशातल्या स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यावरही या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.


संसद भवनात झालेल्या एका बैठकीनंतर पंतप्रधानांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. अधिवेशनात लोकांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी असं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र निकालावर कुठलंही भाष्य केलं नाही. विधानसभांच्या मतमोजणीत राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तिसगढमध्ये काँग्रेसची आघाडी आहे. तर तेलंगणात टीआरएसची लाट आलीय. त्या लाटेल इतर सर्वपक्ष भुईसपाट झाले. या निकालाचे पडसाद संसदेच्या अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे.


विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला नाकारलं तर लोकसभेत काय होणार याची धास्ती भाजपने घेतलीय. 2014 मध्ये राजस्थानच्या एकूण 25 जागांपैकी भाजपने तब्बल 24, मध्यप्रदेशात 29 पैकी 26 तर छत्तीसगडमध्ये 11 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. यातल्या भाजपच्या अर्ध्या म्हणजे 30 जागा जरी कमी झाल्या तरी ती भरपाई कुठून करायची याचं गणित भाजपचे अध्यक्ष अमित शहांना


तीन राज्यांमधली लोकसभा 2014ची स्थिती


मध्यप्रदेश 2014


एकूण जागा 29


भाजप 26


काँग्रेस 03


राजस्थान 2014


एकूण जागा 25


भाजप 24


काँग्रेस 01


छत्तीसगड 2014 


एकूण जागा 11


भाजप 10


काँग्रेस 01

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 10:44 AM IST

ताज्या बातम्या