Budget 2020 : या अर्थसंकल्पात उत्पन्न आणि रोजगारावर भर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Budget 2020 : या अर्थसंकल्पात उत्पन्न आणि रोजगारावर भर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात रोजगार आणि कौशल्यविकासावर भर देण्यात आला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा आहे आणि यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • Share this:

मुंबई, 1 फेब्रुवारी : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात रोजगार आणि कौशल्यविकासावर भर देण्यात आला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा आहे आणि यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्टार्ट अप आणि रिअल इस्टेट उद्योगालाही यामुळे प्रोत्साहन मिळेल, असं ते म्हणाले. रोजगार निर्मितीसाठी गुंतवणूक वाढवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. इनकम टॅक्सच्या रचनेत बदल केल्यामुळे वादातून विकासाकडे वाटचाल होईल कारण करदात्यांचे अधिकार स्पष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, असंही मोदींनी सांगितलं.

(हेही वाचा : Budget 2020: दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे लवकरच होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा)

बँकांमधल्या सुरक्षित ठेवींबद्दल घेतलेला निर्णय सामान्य माणसांच्या हिताचाच ठरेल हे सांगताना पंतप्रधानांनी सुरक्षित ठेवींची मर्यादा वाढवण्याच्या निर्णयाचा उल्लेख केला. बँकांमध्ये गैरव्यवहार झाले तरी खातेदारांच्या 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित राहतील.यामुळे खातेदारांना त्यांच्या पैशांबद्दल चिंता उरणार नाही.

(हेही वाचा : Budget 2020 : PMC बँक घोटाळ्यानंतर खातेदारांना दिलासा, 5 लाखांच्या ठेवी सुरक्षित)

देशभरातल्या एक लाख ग्रामपंचायती ब्राँडबँडने जोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तरुणांच्या नियुक्त्यांसाठी जिल्हा पातळीवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येतील. यामध्ये रेल्वे, बँक आणि वेगवेगळ्या सरकारी विभागाच्या नियुक्त्यांचा समावेश असेल. या सुविधेमुळे तरुणांना नोकरीसाठी वारंवार मोठ्या शहरांपर्यंत यावं लागणार नाही, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये 16 कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. नाशवंत शेतीमालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल आणि कृषी उडान या योजना सुरू करण्यात येणार आहेत, अशीही आठवण त्यांनी करून दिली.

(हेही वाचा : Budget 2020 : आधार कार्ड असेल तर लगेचच मिळणार पॅन कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा)

=================================================================================

First published: February 1, 2020, 5:44 PM IST

ताज्या बातम्या