पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चहावल्यापासून ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69वा वाढदिवस आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये आपला वाढदिवस साजरा करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2019 11:32 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चहावल्यापासून ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील गांधीनगर इथे त्यांच्या आईचा(हिराबेन)आशीर्वाद घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत. प्रत्येक मोठ्या आणि महत्त्वाची कामं करण्याआधी आईचे आशीर्वाद घ्यायला पंतप्रधान मोदी विसरत नाहीत. गरीब कुटुंबात झालेला त्यांचा जन्म, आईचे आशीर्वाद आणि त्यांची मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर आज ते राजकारणात सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचले आहे. त्याचा प्रामाणिकपणा, तत्वनिष्ठता आणि चिकाटी यामुळे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69वा वाढदिवस आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. येथील नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाची ते पाहणी करणार आहेत. यानंतर केवाडियातील एका कार्यक्रमाला ते संबोधितही करणार आहेत.

यांच्याबद्दलच्या या काही खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगर या छोट्याशा गावात झाला. गरीबीची परिस्थिती असल्यानं त्यांनी वडिलांसोबत वडनगर रेल्वे स्थानकात चहा विकण्याचं काम करायला सुरूवात केली. वडिलांना मदत व्हावी म्हणून ते वडिलांच्या कामात मदत करत होते. लहानपणापासून देशसेवा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. एका मुलाखतीत तर त्यांनी हे सांगितलंही होतं की त्यांना भारतीय सैन्यदलात जायचं होतं. मात्र त्यांचं ते स्वप्न राहिलं. त्यांनी जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणे त्यांनी शिक्षण घेतलं. वडिलांपेक्षा अधिक वेळ त्यांचा ग्रंथालयात जायला लागला. वादविवाद करण्यात, चर्चा सत्रांमध्ये ते माहीर होते. अभिनयाची आवड होती. त्यांनी लहानपणीच पंतप्रधान होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं.पंतप्रधान मोदींनी गुजरात विद्यापिठातून मास्टर ऑफ सायन्समध्ये पदवी प्राप्त केली. शालेय जीवनात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षासाठी नामांकन मिळाले. त्यांनी भाजपचे सरचिटणीस, राष्ट्रीय सचिव, गुजरातचे मुख्यमंत्री अशा अनेक पदांवर सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 69वा वाढदिवस, असा आहे त्यांचा संपूर्ण दिवसाचा प्लान

2001मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 2002मध्ये राजकीय दबावामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला मात्र पुन्हा एकदा बहुमतानं जनतेनं त्यांना जिंकवलं आणि ते मुख्यमंत्री झाले. 2007 आणि 2012 साली विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बहुमताने गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचा मान नरेंद्र मोदींनी मिळवला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 13 वर्षाच्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतली नाही.

Loading...

मोदींना सोशल मीडियाचं महत्त्व खूप आधीच माहीत होतं. तरुणांशी कनेक्ट होण्याचा तो सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे त्याचा उत्तम वापर त्यांनी केला. सोशल मीडियावर मोदी कायम अॅक्टिव्ह असतात. 31 ऑगस्ट 2012 रोजी गुगल प्लसच्या नेटिझन्स बरोबर चर्चा करणारे पहिले भारतीय राजकारणी म्हणून मोदींची वेगळी ओळख आहे. 2014च्या निवडणुकीत संपूर्ण कॅम्पेनिंगचा बेस हा सोशल मीडिया होता. ही लोकसभा निवडणूक सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापर करून प्रचार करणारी ठरली. प्रचाराचा चेहरा पंतप्रधान मोदी असा झाला. भाजप म्हणजे पंतप्रधान मोदी आणि मोदी म्हणजे भाजप पक्ष जणू असं समिकरण तयार झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप पक्षाचा एक चेहरा झाले.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात देशासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. नोटाबंदी, जीएसटी, करप्रणालीतील बदल, रस्ते वाहतुकीसाठी केलेले बदल, सर्जिकल स्ट्राईक, ऑनलाईन नेटबँकिंग सुविधा, विविध योजना थेट घरापर्यंत पोहोचवणे आणि त्याचे पैसे सबसिडी थेट जनतेच्या खात्यावर टाकणे, बुलेट ट्रेन, तिहेरी तलाक, कलम 370 हटवण्याचा निर्णय, गंगा शुद्धीकरणाचा निर्णय, संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूक, भूसंपादन कायदा, रोजगार हमी योजनेच्या कायद्यात बदल करणं, अटल बिहारी पेन्शन योजना, सुकन्या योजना, उज्ज्वला योजना, मुद्रा लोन सारख्या महिलांसाठी सुविधा पंतप्रधान मोदींनी आणल्या.

मोदींनी क्रिकेटच्या मैदानातून केली कॉंग्रेसमुक्त भारताची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी जगामध्ये भारताला शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण देशाच्या यादीत समाविष्ट केलं. 2022 पर्यंत विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जे स्वप्न अटल बिहारी वाजपेयी, अब्दुल कलाम यांनी पाहिलं होतं.

VIDEO: उद्धव आणि फडणवीसांमध्ये चढाओढ, कोण रचणार राम मंदिराची पहिली वीट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 08:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...