मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारताच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायेत नव्या भारताची उभारणी

भारताच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायेत नव्या भारताची उभारणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक भारताचं ऐतिहासिक आणि भविष्यातील नव्या भारताशी असलेल्या नात्याचं पुनरुज्जीवन केलं आहे. हा नवीन भारत मानवतेसाठी प्रकाश देण्याचं काम करत राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक भारताचं ऐतिहासिक आणि भविष्यातील नव्या भारताशी असलेल्या नात्याचं पुनरुज्जीवन केलं आहे. हा नवीन भारत मानवतेसाठी प्रकाश देण्याचं काम करत राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक भारताचं ऐतिहासिक आणि भविष्यातील नव्या भारताशी असलेल्या नात्याचं पुनरुज्जीवन केलं आहे. हा नवीन भारत मानवतेसाठी प्रकाश देण्याचं काम करत राहील.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : जगाच्या तुलनेत भारताचा (India’s Heritage) इतिहास, भूगोल आणि संस्कृती खूपच वेगळी आहे. सध्या भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही (Biggest Democracy) तर आहेच, शिवाय मानवतेची भूमी आहे. भारताचा इतिहास नम्रता, दाक्षिण्य, आदर, गुरु-शिष्य परंपरा यांनी भारलेला आहे. थोर गुरू, योगी आणि ऋषीमुनींचा वास या भूमीत होता. हा वारसा समृद्ध करण्याचा वसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. भारताच्या या सांस्कृतिक, ऐतिहासिक वारशाला आधुनिक भारताशी जोडण्याचं काम पंतप्रधान करत आहेत. गेल्या आठ वर्षांमध्ये भारताची जगासमोरील प्रतिमा कमालीची उंचावली आहे. आज जग आधुनिक भारताकडे नव्या आशेनं पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त (PM Narendra Modi’s Birthday) (17 सप्टेंबर 22) त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.

ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा देशातील धर्म, संस्कृती पुन्हा प्रस्थापित करण्याची व मानवतेसाठी राष्ट्राचं उत्थान करण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्यलढ्यातील टिळक, टागोर, विवेकानंद यांसारख्या अनेक विचारवंत नेत्यांना तशी आशा होती. अनेक विचारवंतांनी भारताला मानवतेच्या अध्यात्मिक नूतनीकरणासाठी नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. वसाहतवाद्यांनी आधीच भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक परंपरेचं नुकसान केलं होतं. त्यातच स्वातंत्र्यानंतर सत्ता मिळालेले नेते देशाच्या प्राचीन इतिहासाला, इथल्या धार्मिक प्रगल्भतेला समजून घेण्यात कमी पडले. त्यानंतर उदयाला आलेल्या राजकीय, शैक्षणिक शक्तींवर मार्क्सवादी, वसाहतवादी विचारांचा पगडा राहिला. यामुळे भारताच्या जुन्या परंपरा, संस्कृती हे मिथक असल्याची प्रतिमा बनवली गेली. स्वातंत्र्योत्तर काळातील नेहरूंच्या काँग्रेसनं ऋषीमुनींच्या या पवित्र भूमीचा पुरेसा आदर राखला नाही.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या आधुनिक भारताचा उदय होतो आहे. हा भारत वेगानं विस्तारणारा आहे. यात राजकीय, आर्थिक पातळीवर देशाला सांभाळताना भारताचा चिरंतन इतिहास, संस्कृती व सभ्यतेचा आदर केला जातोय.

पंतप्रधान मोदींच्या या 5 बदलामुळे जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला भाजप! कशी साधली किमया?

वारसास्थळं (Monuments) ही त्या संस्कृतीची द्योतक असतात. भारताच्या बाबतीत शेकडो वर्षं जुनी इथली मंदिरं, पुरातन वास्तू, प्रार्थनास्थळं हा देशाचा वारसा आहे. मात्र या वास्तू अभावानंच टिकून राहिल्या आहेत. अशा वारसास्थळांच्या पुनर्विकासासाठी (Redevelopment) पंतप्रधानांनी पुढाकार घेतला आहे. काशीतील विश्वनाथाचं मंदिर, अयोध्या, केदारनाथ अशा मंदिरांना नवी संजिवनी मोदींनी दिली. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील राजकीय वारसास्थळांचंही पुनरुज्जीवन होणं गरजेचं होतं. देशातील सत्तेचं केंद्र असणाऱ्या दिल्लीतील संसदभवनाच्या विकासाचं काम मोदींनी हातात घेतलं. दिल्लीतील कर्तव्यपथाची उभारणी, सेंट्रल व्हिस्टा (Central Vista Project) प्रकल्प म्हणजे ब्रिटिशांनी उभारलेल्या वास्तूंचं महत्व अबाधित राखत नव्या भारताच्या सांस्कृतिक वारशाला बळ देण्यासारखं आहे.

ज्या थोर पुरुषांमुळे आधुनिक भारत उभा राहतो आहे, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याची संधी मोदींनी सोडली नाही. सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, योगी अरविंद, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या दुर्लक्षित झालेल्या नेत्यांचे पुतळे वारसास्थळं म्हणून मोदींनी उभारले. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या धुरंधर राजांपासून ते अनेक क्रांतिकारकांचा आणि त्यांच्या कार्याचा विविध पद्धतीनं सन्मान करून मोदींनी देशाच्या क्षत्रिय धर्माच्या परंपरेचा आदर केला आहे.

भारत 80 टक्के हिंदू असला, तरी हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारे नरेंद्र मोदी हे देशातील पहिलेच पंतप्रधान असतील. नव्या भारतामध्ये भगवान शंकर, राम, सीता, सरस्वती, कृष्ण, दुर्गा, काली, गणपती आणि हनुमान या देवीदेवतांना नव्यानं महत्त्व मिळू लागलं आहे. पंतप्रधान स्वतः अनेक मंदिरांमध्ये दर्शनासाठी जातात. त्यांचं अनुकरण अनेक नेतेमंडळी करतात. देशातील सण-उत्सवही पंतप्रधान स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर साजरे करतात. योग दिन व आयुर्वेद दिवस हे आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरे केले जातात. आद्य शंकराचार्य, रामानुजन, गौतम बुद्ध, महावीर, गुरु नानक यांच्या देशातील गुरुपरंपरेचा मोदी गौरव करतात.

PM Modi Birthday Special: जगातील हे बडे नेते PM मोदींचे आहेत चाहते, या 5 नेत्यांशी खास मैत्री

इतिहासाप्रमाणेच देशातील भौगोलिक रचनेबाबतही मोदी कमालीचे सतर्क असतात. हिमालयापासून तमिळनाडूपर्यंत काश्मीरपासून पूर्वांचलापर्यंत अनेक ठिकाणांचा विकास मोदींनी केला आहे. त्याचवेळी पर्यावरणाचं भान राखत गंगा नदीला प्रदुषणमुक्त करणं, वनस्पती व प्राण्यांचं संवर्धन व रक्षण, पर्यटनस्थळं व शेतीचा विकास हे सर्व मोदी अविरतपणे करत आहेत.

देशाचा आर्थिक विकास करताना अनेक विकासकामांची पायाभरणी, जीवनशैलीतील सुधारणा, ग्रामीण विकास, भ्रष्टाचारमुक्त भारत अशा अनेक गोष्टी राबवल्या गेल्या. सर्वांचा विकास करून याद्वारे श्रीलक्ष्मी देवीला तिचं स्थान परत मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केली. अ‍ॅथलिट्सचा सन्मान करून देशाच्या शक्तीचा व नवीन उद्योजकांना वाव देऊन देशाच्या समृद्धीचा गौरव मोदींनी केला आहे.

जागतिक पातळीवर भारताची ओळख विश्वगुरु म्हणून करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. जगातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा मोदींनी परराष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध अधिक जोडले आहेत. देशाचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करताना जगाच्या नजरेत भारताला आदर मिळवून देण्याचं मोठं काम मोदी करत आहेत.

या सगळ्याबाबत मोदींवर टीका करणारे अनेकजण आहेत. जुनी घराणेशाही, त्यांचे माध्यम समर्थक, सत्ता न मिळालेले, डाव्या विचारसरणीचे असे अनेक जण त्यांच्यावर टीका करतात. भारताची एकता तोडू इच्छिणाऱ्या शक्तीही त्यांचाच भाग आहेत. भारताचे तुकडे करून त्यावर सत्ता गाजवण्याची त्यांची इच्छा आहे. काहींना मोदी उद्धट वाटतात, तर काहींना असहिष्णु वाटतात. मात्र इतर राष्टांकडे पाहिल्यास लक्षात येईल, की कोणताही देश सर्वसमावेशक नसतो. उलट अनेक देशांमध्ये आज फूट पडली असून, वादही सुरू आहेत. संस्कृती लयाला चालली आहे. अनेक जुन्या परंपरा नष्ट होत आहेत. मात्र भारताचं एक वेगळं रूप उदयाला येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक भारताचं ऐतिहासिक आणि भविष्यातील नव्या भारताशी असलेल्या नात्याचं पुनरुज्जीवन केलं आहे. हा नवीन भारत मानवतेसाठी प्रकाश देण्याचं काम करत राहील.

First published:

Tags: Modi government, PM Modi birthday