#ModiAt70: कोरोना काळात फिट ठेवण्यासाठी PM Modi करतात ‘योगनिद्रे’चा अभ्यास, पाहा VIDEO

#ModiAt70: कोरोना काळात फिट ठेवण्यासाठी PM Modi करतात ‘योगनिद्रे’चा अभ्यास, पाहा VIDEO

शरीर आणि मन तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी योगाभ्यास महत्त्वाचा असतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानसिक आणि शारीरिक स्वास्थ जपण्यासाठी जनतेला आवाहन केलं आहे. या महासंकटातही आपल्या आरोग्याची घरी राहून ते उत्तम काळजी घेत आहेत. कोरोना काळात जीमला जाण किंवा व्यायामासाठी घराबाहेर पडल्यामुळे कोरोनाचा धोका आपल्या घरापर्यंत पोहोचू शकतो. हा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घरी राहून व्यायाम करण्याचा सल्ला काही दिवसांपूर्वी दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं मोदी आपलं आरोग्य कसं सांभाळत आहेत आणि त्यांनी लॉकडाऊनदरम्यान काय काय गोष्टी केल्या हे जाणून घेणार आहोत.

रोज नियमित सकाळी व्यायाम करणं आणि सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे योगाभ्यास करणं महत्त्वाचं आहे. पंतप्रधान मोदी आपल्या निवासस्थानी रोज व्यायाम करतात. काहींना घरामध्ये बसून कंटाळा येतो, चिडचिड होते. अशावेळी योग खूप मदतीचा ठरेल. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्वीट केले आहे. आठवड्यातून 2-3 वेळा ‘योग निद्रा’चा अभ्यास करत असल्याचं त्यांनी एकदा ट्वीटरवरही सांगितलं होतं. यामुळे शरीर स्वास्थ्य आणि मन प्रसन्न राहण्यास मदत होत असल्याचं पंतप्रधान या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

हे वाचा-#ModiAt70 : पुतिन यांनी रशियातून पाठवलं पत्र; काय लिहिलाय शुभेच्छा संदेश?

शरीर आणि मन तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी योगाभ्यास महत्त्वाचा असतो. याआधी 2018 मध्ये फिटनेस चॅलेंजदरम्यानही पंतप्रधान मोदींनी योग आणि व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. याशिवाय मन की बातमधून अनेकदा मोदींनी योग आणि फिटनेसचं महत्त्वची जनतेला सांगितलं आहे. मन आणि तन दोन्ही आनंदी राहण्यासाठी योग करणं कसं महत्त्वाचं आहे आणि स्वत: पंतप्रधान मोदी हा योग करत असतात हे सांगणारे अनेक फोटो व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

2018 मध्ये सोशल मीडियावर फिटनेस चॅलेंज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. त्याच दरम्यान मोदींनीही यामध्ये सहभाग घेऊन आपला व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 17, 2020, 11:28 AM IST

ताज्या बातम्या