#ModiAt70 : पंतप्रधान मोदी आपल्या आरोग्याची कशी घेतात काळजी? 2 वर्षांपूर्वी शेअर केला होता VIDEO

#ModiAt70 : पंतप्रधान मोदी आपल्या आरोग्याची कशी घेतात काळजी? 2 वर्षांपूर्वी शेअर केला होता VIDEO

या व्हिडिओमध्ये मोदी पंतप्रधान निवासस्थानातील अंगणात चालत, व्यायाम, योग, प्राणायाम करताना दिसत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फिटनेसच्या बाबतीत खूप तत्पर आहेत. ते स्वत: रोज योग आणि व्यायाम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'हम फिट तो इंडिया फिट' असं एक चॅलेंजही दोन वर्षांपूर्वी दिलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज सत्तरावा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्तानं पुन्हा एकदा फिटनेस चॅलेंजचा हा 2 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मोदी पंतप्रधान निवासस्थानातील अंगणात चालत, व्यायाम, योग, प्राणायाम करताना दिसत आहेत. आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी एच डी कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मणिका बत्रा यांना

टॅग करत चॅलेंज दिलं होतं.

हे वाचा-#ModiAt70 : पुतिन यांनी रशियातून पाठवलं पत्र; काय लिहिलाय शुभेच्छा संदेश?

कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी फिट आहेत. याचं कारण म्हणजे त्यांचं योगा आणि व्यायाम. आरोग्याची काळजी पंतप्रधान मोदी कशी घेतात हे त्यांनी 2 वर्षांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. व्यायाम करतानाचा हा व्हिडीओ मोदींनी ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहलं की, 'मी ज्या ट्रॅकवर चालत आहे, तो प्रकृतीच्या 5 घटकांपासून म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांपासून प्रेरित आहेत.'

राज्यवर्धनसिंग राठोड यांनी 2018 मध्ये ट्विटरवर डिप्स मारतानाचा व्हिडीओ शेअर केला होता आणि त्यात क्रिकेटर विराट कोहलीला टॅग केलं होतं. ते चॅलेंज स्वीकारत विराटनं टाकलेल्या व्हिडीओत पंतप्रधान मोदींना टॅग केला होता. या चॅलेंजमध्ये दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते.

दोन वर्षांपूर्वी फिटनेस चॅलेंज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. या चॅलेंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. त्यांच्या या फिटनेसचा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 17, 2020, 9:19 AM IST

ताज्या बातम्या