पंतप्रधान मोदींना थेट वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत? मग वापरा ही पद्धत

पंतप्रधान मोदींना थेट वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत? मग वापरा ही पद्धत

आधी नमो अॅप डाऊनलोड करा. तिथे अॅपवर आपली माहिती भरून साइन इन करा.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस. देश-विदेशातील नेत्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या स्तरावर पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या जात आहे. कुठे ट्वीट करून तर कुणी फेसबुकवर पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत आहे. पण थेट पंतप्रधान मोदींपर्यंत या शुभेच्छा पोहोचवायच्या असतील तर त्या कशा पोहोचणार यासाठी भाजपकडून खास आजच्या दिवशी नमो अॅपद्वारे शुभेच्छा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींना घरबसल्या नमो अॅपच्या मदतीनं हजारो नागरिक शुभेच्छा देत आहेत. तुम्हीही यापैकी असू शकता असा नमो अॅपच्या फोटोसह भाजपकडून ट्वीट करण्यात आलं आहे. मनो अॅपवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अक्षर: शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हे वाचा-#ModiAt70 : पुतिन यांनी रशियातून पाठवलं पत्र; काय लिहिलाय शुभेच्छा संदेश?

पंतप्रधान मोदींना थेट वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्यायच्या?

आधी नमो अॅप डाऊनलोड करा. तिथे अॅपवर आपली माहिती भरून साइन इन करा. त्यानंतर new india Wish module अंतर्गत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या थेट शुभेच्छा देऊ शकता.

जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज सत्तरावा वाढदिवस. देशभरातून त्यांच्यासाठी शुभेच्छांचा ओघ सुरू आहे. परदेशातल्या काही बड्या नेत्यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त खास त्यांच्यासाठी शुभेच्छा संदेश पाठवून मनःपूर्वक अभिनंदन केलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 17, 2020, 12:58 PM IST
Tags: pm modi

ताज्या बातम्या