'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा ट्रेलर YouTubeवरून गायब

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? जर पाहिला नसेल तर सिनेमाचा ट्रेलर आता तुम्ही पाहू शकणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 07:41 AM IST

'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा ट्रेलर YouTubeवरून गायब

नवी दिल्ली, 17 एप्रिल : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? जर पाहिला नसेल तर सिनेमाचा ट्रेलर आता तुम्ही पाहू शकणार नाही. कारण यु-ट्यूबवरूनचा सिनेमाचा ट्रेलर गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात रिलीज करण्यात आलेला हा ट्रेलर अचानक गायब झाला आहे.

गुगल असो वा यु-ट्यूब 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा ट्रेलर कुठेच दिसत नाहीय. 'पीएम नरेंद्र मोदी बायोपिक' ट्रेलर असं गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला 'मोदी: जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' या बेवसीरिजचा ट्रेलर दिसेल.

तसंच यु-ट्यूबवर 'पीएम नरेंद्र मोदी बायोपिक ट्रेलर' टाइप केल्यास 'हा व्हिडीओ उपलब्ध नाही', असा मेसेज तुम्हाला दिसेल. इंटरनेटवरून अचानक सिनेमाचा ट्रेलर गायब होण्यामागे कदाचित सिनेमाच्या प्रदर्शनावर लावण्यात आलेल्या बंदीचं कारण असू शकतं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं या सिनेमाच्या रिलीजवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा ट्रेलर 12 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. 12 एप्रिल रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार होता. मात्र अनेक वादविवादांमुळे निवडणूक आयोगानं सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणली. या सिनेमाद्वारे अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.

वाचा अन्य बातम्या

Loading...

संतापजनक ! आदिवासी वसतीगृहातील दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण

SPECIAL REPORT: नागपुरात डबल मर्डरचा अखेर उलगडा; 'या' कारणासाठी चंपाती दाम्पत्याची हत्या


World Cup : अंबाती रायडूनं निवड समितीला मारला खोचक टोमणा

VIDEO : राष्ट्रवादीच्या तळावर सर्जिकल स्ट्राईक, प्रीतम यांचं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 07:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...