विरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी

विरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी

'आम्ही गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवाद यांना हटविण्याच्या मागे आहोत आणि विरोधकांना फक्त मोदींना हटवायचं आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 20 जानेवारी : कोलकत्यात झालेल्या महाआघाडीच्या शक्ती प्रदर्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधकांना टार्गेट केलंय. निवडणुकांना अजुन काही महिने वेळ आहे. मात्र ते पराभवाच्या भीतीने आत्तापासूनच EVM मशीन्सवर खापर फोडण्याचा प्रयत्न करताहेत असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान रविवारी टेलिकॉन्फन्सच्याव्दारे गोव्यातल्या बुथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.

विरोधकांच्या महाआघाडीवर टीका करताना ते म्हणाले, "ही आघाडी नामदारांची आघाडी आहे. जाती-पातीचं राजकारण,भ्रष्टाचार, घोटाळे, घराणेशाही, अस्थिरता याचा अद्भूत संगम म्हणजे ही महाआघाडी आहे."

गोव्यातल्या खाणींवर उच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. त्यावरही पंतप्रधानांनी आपलं मत व्यक्त केलं.

खाणी हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा घटक आहेत. पण त्याचबरोबर पर्यावरणाचीही काळजी घेतली पाहिजे. यावर अभ्यास करण्यासाठी काही तज्ज्ञांची समिती नेमली असून त्याचा अहवाल आल्यावर त्यावर कार्यवाही करू असं आश्वासनही त्यांनी दिलं.

शनिवारी कोलकत्यात झालेल्या विरोधकांच्या रॅलीत देशभरातले सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्या सर्वच नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना टार्गेट केलं होतं. यावर पंतप्रधानांनी शनिवारीच टीकाही केली होती. या रॅलीतून फक्त वाचवा, वाचवा असे सूर येत होते अशी टोकी मोदींनी केली होती. आम्ही गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवाद यांना हटविण्याच्या मागे आहोत आणि विरोधकांना फक्त मोदींना हटवायचं आहे अशी टीकाही त्यांनी केली होती.

VIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर

First published: January 20, 2019, 5:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading