News18RisingIndia : महागाईपासून रोजगारापर्यंत - पंतप्रधान मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

News18RisingIndia : महागाईपासून रोजगारापर्यंत - पंतप्रधान मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

महागाई, विकासदरापासून भ्रष्टाचार आणि रोजगारापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले हे आहेत महत्त्वाचे मुद्दे... न्यूज18 रायझिंग इंडिया या शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी त्यांनी केलेलं भाषण सविस्तर ..

  • Share this:

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : आता काही काळापूर्वीच मला राष्ट्रीय समर स्मारक देशाला समर्पित करण्याचं भाग्य लाभलं. त्यानंतर लगेचच रायझिंग इंडिया या विषयाला वाहिलेल्या परिषदेमध्ये मला बोलायला मिळतंय, तेही अशा विषयावर जो माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे, असं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज18 नेटवर्कच्या Rising India Summitमध्ये संवादाला सुरुवात केली.

वेगवेगळ्या विचारसरणीचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे तज्ज्ञ, नेते, कलाकार यांना एका मंचावर आणून देशाच्या विकासावर चर्चा घडवून आणायचं काम न्यूज18 नेटवर्क करत आहे. या परिषदेच्या पहिल्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात पंतप्रधानांनी संवाद साधला.

मागच्या वर्षांत काय झालं, आधी काय होतं, हे मी सांगणार आहे, असं सांगत मोदींनी सुरुवात केली. "देशात व्यापारविषयी चांगलं धोरण आणलं. त्यामुळे Ease of doing Business चं भारताचं रँकिंग उंचावलं. 142 वरून 77 वर आलं." सिस्टीम स्मूथ आणि पारदर्शी होते आहे, हे गेल्या काही वर्षांत होतं आहे, असं ते म्हणाले.

Beyond Politics: Defining National Priorities या विषयावर बोलायला सांगितल्याबद्दल न्यूज18 टीमचं अभिनंदन करतो, असं सांगून ते म्हणाले की, देशाच्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात राष्ट्रनिर्माणाची दिशा काय असेल, प्राधान्यक्रम काय असेल यावर विचारमंथन होणं अगदी आवश्यक आहे.

"माध्यमांचे प्रतिनिधी समोर आहेत, तर त्यांना आवडेल अशाच प्रकारे सांगतो. आधी काय होतं आणि आता काय आहे, अशी मांडणी करणार आहे. 2014 च्या आधी देशाची परिस्थिती अशी होती की, ज्या गोष्टी कमी व्हायला हव्यात त्या वाढत होत्या आणि ज्या वाढायला हव्या त्या कमी होत होत्या", असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांवरच तोफ डागली. मोदी म्हणाले, "महागाई वाढत होती आणि विकास कमी होत होती. किती वेळा ही हेडलाईन लावली असेल? महागाई 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली होती ती आता 2 ते 4 टक्क्यांवर आली आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

महागाई वाढत होती आणि विकास कमी होत होती. किती वेळा ही हेडलाईन लावली असेल? महागाई 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली होती ती आता 2 ते 4 टक्क्यांवर आली आहे.

महेंगाई डायन खाए जात है, असं किती वेळा शोमध्ये न्यूजरूम प्रोड्युसर्सनी म्हटलं असेल. आता हीच स्थिती इनकम टॅक्सच्या बाबतीत होती. 2.5 लाखापर्यंत इनकाम टॅक्सची सीमा होती. 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरचा कर आम्ही 10 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत आणला आणि आता या वर्षी तर करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवून 5 लाख केली आहे.

GDP growth चा आता विचार केला, तर पहिलं सरकार आणि आताचं सरकार, त्यांचा प्राधान्यक्रम आणि आमचा यातला फरक लक्षात येईल. 2004 मध्ये वाजपेयी सरकारकडून UPA कडे कारभार गेला तेव्हा 8 टक्क्यावर विकासदर होता. 2013-14ला UPAची बिदाई होत होती तेव्हा विकासदर 5 टक्क्यांवर आला होता. 2014 ला आम्ही पुन्हा आव्हान स्वीकारलं आणि GDP Growth Rate ला आमच्या सरकारने 7 -8 टक्क्यांवर आणून ठेवलं आहे.

भारताच्या  Global Standing ची गोष्टही तीच आहे. 2013 साल उजाडताना भारताची गणना Fragile Five मध्ये होत होती. आता सव्वाशे कोटी देशवासीयांच्या परिश्रमांचं फळ म्हणजे भारत Fastest Growing Major Economy झाला आहे.

देशात व्यापारविषयी चांगलं धोरण आणलं. त्यामुळे Ease of doing Business चं भारताचं रँकिंग उंचावलं. 142 वरून 77 वर आलं. सिस्टीम स्मूथ आणि पारदर्शी होते आहे, हे गेल्या काही वर्षांत होतं आहे. Ease of doing Business चा क्रमांक घसरला कारण भ्रष्टाचाराचा ग्राफ आकाशाला भिडला होता. स्पेक्ट्रमपासून सबमरीनपर्यंत आणि कोळशापासून CWG पर्यंत भ्रष्टाचारातून काहीच सुटलं नव्हतं. सुप्रीम कोर्ट, मीडिया सगळीकडे सरकारी भ्रष्टाचाराची प्रकरणं गाजत होती.

आता परिस्थिती अशी आहे की, विरोधक काही चुकीच्या पद्धतीने कोर्टात जातात आणि कोर्टाचा फटकारा मिळतो आणि सरकारचं मात्र कोर्टात कौतुक होतं. राजकारणाच्या पलीकडे गेलेले आमचे प्राधान्यक्रम आहेत.

जनधन योजनेची अनेकांनी थट्टा केली. बातम्यांमध्येही यावर टीका झाली. गरिबांसाठी बँकखातं उघडून काय तीर मारले, अशी टीका झाली. याच मानसिकतेमुळे स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीही बँक खाती नव्हती. आता मात्र 34 कोटीपेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली आहेत. जगात या काळात जेवढी खाती उघडली गेली, तेवढीच साधारण भारतात उघडली गेली. जनधनची खाती आधार नंबरची जोडली. आता यामुळे विरोधकांना पोटदुखी का होती?  इथे जनधन खाती उघडली जात होती, लाभार्थींना पैसे देण्यासाठी ही पारदर्शी योजना आणण्यासाठी खाती आधारला जोडली. एकेक योजना पारखून घेतली गेली.  425 योजनांचा पैसा थेट लाभार्थींच्या खात्यात जातो. 6 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने थेट लाभार्थींच्या खात्यावर जमा केले आहेत. ही छोटी रक्कम नाही. पूर्ण 100 टक्के रक्कम लाभार्थींना मिळतच नव्हती. ती आता मिळते आहे, हे पूर्वी होत नव्हतं. ही त्यांची पोटदुखी आहे. पहिल्यांदा 100 तले फक्त 15 पैसे लाभार्थींनी मिळायचे, आता पूर्ण मिळतात.

सरकारच्या या धोरणाचा भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर काय परिणाम होतोय, हे जाणून घेणं आवश्यक आहे.

जनधन अकाउंट, आधार आणि मोबाईल जोडण्याचा परिणाम असा झाला की, एकेक बनावट नावं उघडकीला यायला लागली. पूर्वीच्या सरकारच्या काळात 8 कोटी लोक असे होते, ज्यांची बनावट नावं लाभार्थींच्या यादीत होती. त्यांच्या नावावर सरकारी पैसा जमा होत होता.  1 लाख 10 हजार कोटी रुपये चुकीच्या हातात पडत होते. आता हे पैसे वाचताहेत, म्हणजेच कुणा खऱ्या लाभार्थींना मिळत आहे.

बँक अकाउंट, डेटा आणि टेक्नॉलॉजीची हीच ताकद जगातली सर्वात मोठी जनकल्याण योजना मजबूत करत आहे. आयुष्मान भारत योजना देशातल्या 50 कोटी गरिबांना लाभदायी ठरते आहे. 5 लाख रुपयांपर्यंतचा इलाज मोफत होतोय.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरुवात झाली आहे. देशातले 12 कोटी शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय याचा फायदा घेत आहेत. धान्य खरेदीसाठी सरकार वर्षभरात 75 हजार कोटी रुपये खर्च करते. हे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.

आता यात कुणाला चारा घोटाळा करायचा असेल तरी कसा करणार? कारण आता थेट शेतकऱ्याच्या मोबाईलवर मेसेज येणार. कच्च्या पक्क्या पावतीचा सगळा व्यवहार मोदींनी संपवून टाकला आहे. त्यामुळे ते मला शिव्या देत आहेत.

ज्यांच्या लुटीचे रस्ते मी बंद केले, ते एकत्र येऊन मला शिव्या देत आहेत. त्यांचा प्राधान्यक्रम मोदींना शिव्या देण्याचा आहे . माझा प्राधान्यक्रम देशाच्या इमानदार करदात्याचा पैसा योग्य ठिकाणी खर्च करणं हा आहे.

राजकारणापेक्षा राष्ट्रनीतीला महत्त्व दिलं तर त्याचे परिणाम चांगले होतात, पूर्वीच्या सरकारच्या काळात ज्या गोष्टी कमी व्हायला हव्यात त्या वाढत होत्या आणि ज्या वाढायला हव्या त्या कमी होत होत्या

आमचं सरकार काम वेळेवर न करणं हेसुद्धा अपराध मानतं. कारण यातच करदात्यांचा पैसा वाया जातो. यूपीमध्ये एक जलसिंचन योजना आहे. बाणसागर नाव आहे त्याचं. ४ दशकांपूर्वी ती सुरू झाली. त्या वेळी 300 कोटी रुपयांत याचं काम होण्याचा अंदाज होता. पण ती योजना अडकली. एवढे वर्षं लटकली. 2014मध्ये आमचं सरकार झालं त्या वेळी ती पूर्ण झाली, पण एव्हाना खर्च गेला होता 3000 कोटी रुपयांवर.

रोजगार वाढला, स्वयंरोजगार वाढले

भारत आता सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होत आहे. गरीब लोक बिनानोकरीचे गरिबीतून बाहेर कसे येतील? तुमच्या आसपासच्या भागात किती इंजिनिअर, सीए, डॉक्टर झालेले तुम्हाला दिसताहेतय इन्कम टॅक्सच्या आकड्यांनुसार गेल्या ४ वर्षांत 6 लाख प्रोफेशनल्स वाढले आहेत. या प्रोफेशनल्सनी गेल्या काही वर्षांत लाखो लोकांना रोजगार दिला असणार.

रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांची गोष्टही तीच आहे. नोएडामध्ये अर्ध्याहून अधिक जागा रिकामी असायची ती आता पार्किंगने भरलेली आहे. इथे आता जागाच उरलेली नाही. म्हणजे गाड्या वाढल्या आहेत.

गेल्या चार वर्षांत 4 कोटी लोकांना पहिल्या व्यवसायासाठी कर्ज मिळालं. एवढ्या मोठ्या संख्येने स्वयंरोजगारासाठी कधी प्रोत्साहित केलं गेलं होतं का? हे लोक त्यातून नवीन रोजगार निर्माण करणार आहेत. EPFO ला 5 लाख लोक दर महिन्याला जोडले गेले आहेत.  रोजगार वाढत आहेत. देशातले जॉब्ज जगासाठी नक्की आदर्श ठरतील. नवीन भारताच्या निर्माणासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असं पंतप्रधान शेवटी म्हणाले.

रायझिंग इंडिया ही दोन दिवसांची शिखर परिषद आज सुरू झाली. 26 फेब्रुवारीला अमित शाह, सुप्रिया सुळे, राम माधव, सचिन पायलट, स्मृती इराणी या राजकारण्यांबरोबरच दीपिका पदुकोण, तापसी पन्नी, मेरी कोम, अनिल कुंबळे आदी सेलेब्रिटी सहभागी होणार आहेत.

भारत आता सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होत आहे.

 

=================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 11:21 PM IST

ताज्या बातम्या