पंतप्रधानांचं भाषण सुरू असतानाच महिला पोलीस कर्मचाऱ्याला आली चक्कर, पाहा मोदींनी काय केलं VIDEO

पंतप्रधानांचं भाषण सुरू असतानाच महिला पोलीस कर्मचाऱ्याला आली चक्कर, पाहा मोदींनी काय केलं VIDEO

हिमाचल प्रदेशमधल्या मनाली इथे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल रोहतांग बोगद्याचं (Atal Rohtang Tunnel) उद्घाटन झाले.

  • Share this:

लखनऊ 03 ऑक्टोबर:  हिमाचल प्रदेशमधल्या मनाली इथे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल रोहतांग बोगद्याचं  (Atal Rohtang Tunnel) उद्घाटन झाले. या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांचं भाषण सुरू असतांनाच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला चक्कर आली. पंतप्रधानांचं त्याकडे लक्ष जाताच त्यांनी आपलं भाषण मध्ये थांबवत महिला पोलिसाला खुर्चीवर बसविण्यास सांगितले. आणि आपल्या सोबत आलेल्या डॉक्टरांच्या पथकाला उपचार करण्याची सूचना केली. यानंतर त्यांनी पुन्हा आपलं भाषण सुरू केलं.

कामाच्या ताणामुळे त्यांना चक्कर आली असावी असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले.

हा बोगदा म्हणजे केवळ बोगदा नसून हिमालयातील इतक्या उंच ठिकाणी अस्तित्वात आलेलं एक स्वप्नच आहे असं सजलं जातं. लाहौल खोऱ्याला जीवनदान देणारा असा बोगदा तयार करता येऊ शकेल असा कुणी विचारही केला नसेल.

आतापर्यंत थंडीचे 6 महिने होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे लाहौलच्या परिसराचा देशाशी संपर्क तुटलेला असायचा. पण आता या बोगद्यामुळे हा भाग देशाशी 12 महिने संपर्कात राहणार आहे.

एवढ्या उंचीवरच्या जगातील कोणत्याही महामार्गावर इतक्या लांबीचा बोगदा अस्तित्वात नाही त्यामुळे अशा प्रकारचा हा जगातील एकमेव बोगदा आहे. या बोगद्याचा इतिहासही खूप रंजक आहे.

1860 मध्ये पाहिलं होतं स्वप्नं

इंग्रजांच्या काळात 1860 साली मोरावियन मिशनरींनी रोहतांग खोऱ्यातून बोगदा काढण्याची कल्पना मांडली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1953 मध्ये बोगद्याची कल्पना रद्द करून राहलाफालपासून रोहतांग आणि कोकसरपर्यंत रोप-वे तयार करण्याची योजनाही तयार करण्यात आली होती पण ती कागदावरच राहिली.

या बोगद्याचं डिझाइन तयार करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्नोई माउंटेन इंजिनीअरिंगने आपल्या वेबसाइटवर असा दावा केला आहे की, 1860 मध्ये मोरावियन मिशनरींनी रोहतांगजवळ बोगदा खणण्याची कल्पना पहिल्यांदा मांडली होती. या बोगद्याचं डिझाइन घोड्याच्या नालेसारखं आहे.

इंदिराजींचं स्वप्न अटलजींनी पूर्ण केलं

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या सरकारने मनाली-लेहमध्ये वर्षभर संपर्क राहावा म्हणून रस्त्याची योजना तयार केली होती. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयींनी 2002 मध्ये रोहतांगमध्ये बोगदा तयार करणार असल्याचं जाहीर केलं. 2019 मध्ये वाजपेयींच्या नावावरच या बोगद्याचं नाव अटल बोगदा असं ठेवण्यात आलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 3, 2020, 3:55 PM IST

ताज्या बातम्या