Home /News /national /

सलाम! कॅप्टन स्वाती रावल यांनी धाडसी कामगिरी, इटलीमध्ये अडकलेल्या 263 भारतीयांना केलं एअरलिफ्ट

सलाम! कॅप्टन स्वाती रावल यांनी धाडसी कामगिरी, इटलीमध्ये अडकलेल्या 263 भारतीयांना केलं एअरलिफ्ट

एअर इंडियाच्या कॅप्टन स्वाती रावल या भारतीय यांनी रोममधील 263 भारतीयांना एअरलिफ्ट करून भारतामध्ये सुखरूप आणलं आहे.

    नवी दिल्ली, 24 मार्च : संपूर्ण जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा (Coronavirus) हाहाकार सुरू आहे. चीननंतर इटली, स्पेन, इराण आणि अशा शंभरहून अधिक देशांमध्ये कोरोनामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. मृतांचा आकडा मोजणंही कठीण होऊन बसलं आहे. भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 499 वर पोहोचली आहे. दरम्यान WHO ने देखील भारताने कोरोनाबाबतीत घेतलेल्या आक्रमक भूमिकेचं कौतुक केले आहे. त्यामुळे आपला देश कोरोनाला निश्चित हरवू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. (हे वाचा- 'या' आईच्या तरी भावनांचा आदर करा, PM मोदींनी शेअर केला भावुक करणारा VIDEO) दरम्यान कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये हजारो ‘कोरोना कमांडो’ जीवाची बाजी लावून भारतीयांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मग त्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस प्रशासन, रिसर्चर्स यांचा समावेश आहे. या सर्व परिस्थितीमध्ये एअर इंडियाच्या कॅप्टन असणाऱ्या एका महिलेने खूप कमाल कामगिरी केली आहे. एअर इंडियाच्या कॅप्टन स्वाती रावल या भारतीय यांनी रोममधील 263 भारतीयांना एअरलिफ्ट करून भारतामध्ये सुखरूप आणलं आहे. या रेस्क्यू ऑपरेशन नंतर कॅप्टन रावल अशाप्रकारे रेस्क्यू ऑपरेशन हाती घेणाऱ्या पहिल्या सिव्हिल पायलट ठरल्या आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून त्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, मात्र सुरूवातीपासूनच त्यांना फायटर पायलट बनण्याची इच्छा होती. मात्र त्यावेळी इंडियन एअरफोर्समध्ये महिलांना परवानगी नव्हती. त्यामुळे त्या कमर्शिअल पायलट बनल्या. रावल यांना एक मुलगा देखील आहे. (हे वाचा- आता घरच्या घरी कळतील कोरोनाची लक्षणं, रिलायन्सने आणले MyJio Coronavirus Tool) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील 23 मार्चला एअर इंडियाच्या या कामगिरीबद्दल ट्वीट केले आहे. या मोहिमेमध्ये कॅप्टन स्वाती रावल यांच्या नेतृत्वाखाली कॅप्टन राजा चौहान यांनी देखील ही जोखीम पत्करली. त्याचप्रमाणे अनेकांनी ट्वीट करत या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. कोरोनाशी दोन हात करताना कॅप्टन स्वाती रावल आणि कॅप्टन राजा चौहान यांसारख्य़ा देशाच्या ‘हिरों’ची खूप मोठी मदत होणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या