VIDEO : PM मोदींनी अमेरिकन खासदाराच्या पत्नीची मागितली माफी, पाहा नेमकं काय झालं

VIDEO : PM मोदींनी अमेरिकन खासदाराच्या पत्नीची मागितली माफी, पाहा नेमकं काय झालं

पंतप्रधान मोदींनी हाऊडी मोदी कार्यक्रमावेळी एका अमेरिकन खासदाराच्या पत्नीची माफी मागितली. यावेळी मोदी म्हणाले की तुम्हाला माझा द्वेष वाटत असेल.

  • Share this:

ह्यूस्टन, 23 सप्टेंबर : अमेरिकेत एनआरजी स्टेडियममध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी' (Howdy Modi ) कार्यक्रमात मोदींनी आपल्या भाषणाने सगळ्यांची मने जिंकून घेतली. या कार्यक्रमाला 50 हजारांपेक्षा जास्त भारतीय उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचं स्टेडियममध्ये आगमन होताच सर्व नागरिकांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं स्वागत केलं. भारत माता की जय, वंदे मातरम् आणि जय श्रीराम या घोषणांनी लोकांनी सगळं स्टेडियम दणणून सोडलं.

दरम्यान, या कार्यक्रमावेळी मोदींनी अमेरिकन खासदाराच्या पत्नीची माफी मागितल्यानं सर्वजण हैराण झाले. मोदींची भेट झाली त्याच दिवशी खासदाराच्या पत्नीचा वाढदिवस होती. मात्र मोदींच्या कार्यक्रमामुळे खासदार पत्नीसोबत नव्हते. मोदींनी माफी मागत असलेला हा व्हिडिओ पंतप्रधान कार्यालयाने शेअर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकन खासदार जॉन कार्निन यांच्या पत्नीची माफी मागितली. कारण कार्निन पत्नीच्या वाढदिवसाला हाऊडी मोदी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले होते. मोदी म्हणतात की, मी मापी मागतो काऱण आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुमचा पती माझ्यासोबत आहे. नक्कीच तुम्ही माझा द्वेष करत असाल. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो.

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. 1000 हून अधिक व्हॉलिंटिअर्स (स्वयंसेवक) या कार्यक्रमासाठी गेली काही दिवस झटत होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तब्बल 50 हजारहून अधिक नागरिकांनी नावनोंदणी केली होती. विशेष म्हणजे पोप यांच्यानंतर अमेरिकेत येणाऱ्या परदेशी नेत्याच्या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळाली आहे.

'हाऊडी मोदी' म्हणजे काय?

'Howdy' हा शब्द 'How do you do' याचं संक्षिप्त रूप आहे. 'Howdy' या शब्दाचा अर्थ म्हणजे 'तुम्ही कसे आहात'. अमेरिकेतील पाश्चात्य राज्यांमध्ये 'Howdy' या शब्दाचा प्रयोग तेथील बोलीभाषेत प्रचलित आहे.

VIDEO: शिवच्या आईवर वीणाची जादू...सांगितला पुरणपोळीचा किस्सा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading