'पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे आणि देशाचे डॅडी'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे आणि देशाचे डॅडी'

पंतप्रधान आमचे डॅडी असल्याचं विधान तामिळनाडूतील AIADMKच्या मंत्र्यानं केलं आहे.

  • Share this:

चेन्नई, 9 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे आणि देशाचे डॅडी असल्याचं विधान तामिळनाडूतील AIADMKचे नेते आणि मंत्री राजेंद्र बालाजी यांनी केलं आहे. जयललिता यांनी राष्ट्रीय पक्षांशी आघाडी करण्याचं टाळलेलं असताना AIADMKनं लोकसभेसाठी भाजपशी कशी काय आघाडी केली? असा सवाल राजेंद्र बालाजी यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी अम्मांचा ( जयललिता ) निर्णय वेगळा होता. पण, आता अम्मांच्या मागे मोदी हे आमचे आणि देशाचे डॅडी असल्याचं विधान राजेंद्र बालाजी यांनी केलं आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरता AIADMKनं भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्याच पार्श्वभूमिवर हा प्रश्न विचारण्यात आला होता.

भाजपच्या बैठकीत ठरला मोदींसाठी मतदारसंघ, निवडणूक जिंकण्यासाठी 'हा' आहे मास्टरप्लॅन

लोकसभेसाठी भाजपनं कंबर कसली

2014च्या तुलनेत 2019च्या निवडणुका या भाजपला काहीशा कठिण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपनं मित्र पक्ष वाढवण्यावर भर दिला.  भारतीय जनता पक्षानं तामिळनाडूमध्ये AIADMK, महाराष्ट्रात शिवसेना आणि पंजाबमध्ये अकाली दलाशी हातमिळवणी केली आहे. 2019मध्ये सत्ता कायम राखण्यासाठी सध्या भाजपनं रणनिती देखील आखली आहे.

'राफेल प्रकरणाच्या फाईल्स मनोहर पर्रिकरांकडे'

भाजपचा मास्टर प्लॅन तयार

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक नुकतीच झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून रणनीती आखण्यात आली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याबाबतही मोठी खलबतं झाली. नरेंद्र मोदी वाराणसी हा आपला एक मतदारसंघ कायम ठेवतील तर ते दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून लढणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

भाजपने आगामी निवडणुकीत मित्रपक्ष जोडण्यावर सर्वाधिक भर दिल्याचं पाहायला मिळतंय. कार्यकारणीच्या बैठकीतही यावरच अधिक जोर दिला जावा, असा सूर उमटला आहे. मागील निवडणुकीत आमच्यासोबत 16 घटकपक्ष होते तर येणाऱ्या निवडणुकीत 29 पक्ष आमच्या सोबत असतील, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

उंदराने चोरले कोट्यवधींचे हिरे, CCTV VIDEO व्हायरल

First Published: Mar 9, 2019 12:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading