नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी ट्विटरवरील नावात केला बदल

नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी ट्विटरवरील नावात केला बदल

चौकीदार चोर है', या राहुल गांधी यांच्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनं 'मै भी चौकीदार' म्हणत एक व्हिडीओ नुकताच तयार केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील नावात बदल केला आहे. 'चौकीदार नरेंद्र मोदी' असं मोदींच्या ट्विटर अकाऊंटचं नाव ठेवण्यात आलं आहे. अमित शहांनीही ट्विटरवर आपल्या नावाआधी चौकीदार असं लिहिलं आहे.

चौकीदार चोर है', या राहुल गांधी यांच्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनं 'मै भी चौकीदार' म्हणत एक व्हिडीओ नुकताच तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर देखील शेअर केला आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर रिट्विट आणि लाईक्स मिळाल्या. पण, त्याला देखील राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी 'मै भी चौकीदार' म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, नीरव मोदी, विजय माल्ल्याचा फोटो ट्विट केला आहे. राफेल करारावरून राहुल गांधी यांनी 'चौकीदार ही चोर है' असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला होता. त्याला भाजपनं व्हिडीओ करत उत्तर दिलं.

सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राहुल गांधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागत आहेत.

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये भ्रष्टाचार, काळा पैसा, विकास आणि सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकसारख्या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील प्रत्येक भागातील नागरिकआणि त्यांच्या भावना 'मै भी चौकीदार हूँ' या व्हिडीओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच 31 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधा असा शेवट या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुका आता काही दिवसांवर आल्यानं भाजपनं आता थेट व्हिडीओच्या माध्यमातून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

SPECIAL REPORT: पवारांच्या खेळीने आमदार कर्डिले धर्मसंकटात?

First published: March 17, 2019, 11:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading