अति आत्मविश्वास ही माझी समस्या आहे -पंतप्रधान मोदी

अति आत्मविश्वास ही माझी समस्या आहे -पंतप्रधान मोदी

  • Share this:

नवी दिल्ली, 24 एप्रिल : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मोदींनी आपलं काम आणि खासगी आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या.  'मी कधीही पंतप्रधान होईन, असा विचारदेखील केला नव्हता. पण परिस्थिती तशा निर्माण होत गेल्या',असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीतील मुद्दे

1. आपल्या देशात रोगराई ही सर्वात मोठी समस्या आहे, यापासून बचाव करण्यासाठी स्वच्छता आणि आरोग्याकडे योग्य प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे - पंतप्रधान मोदी

2. जेव्हा मी चहा विकत होतो तेव्हा बरंच काही शिकायला मिळालं. चहा पिणारी लोक अनेकदा विनाकारण मला ओरडायची - पंतप्रधान मोदी

3. पहाटे पाच वाजता मी चहा पितो. यानंतर संध्याकाळी 6 वाजता मला चहा प्यायची सवय आहे. खुल्या वातावरणात चहा पिणं मला पसंत आहे - पंतप्रधान मोदी

4. पंतप्रधान मोदींनी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाचाही उल्लेख यावेळी केला. मोदी म्हणाले की, ‘मी ट्विंकल यांनाही ट्विटरवर पाहतो. त्या माझ्यावर एवढ्या राग काढतात की कधी-कधी मला वाटतं तुमच्या घरात फार चांगलं वातावरण असेल कारण ट्विंकल त्यांचा सगळा राग ट्विटरवरच काढतात.'

5. पंतप्रधान झाल्यानंतर जो फायदा मला मिळाला आहे, तोच फायदा कदाचित आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधान झालेल्या व्यक्तीला मिळाला असेल. इतक्या वर्षांपर्यंत गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी होतो, अतिशय बारकाईनं काम करावं लागतं. मुद्दे तुमच्यासमोर थेट येतात आणि त्यांचं समाधानदेखील तुम्हाला थेटच करावं लागतं - पंतप्रधान मोदी

6. मला अलादीनचा दिवा मिळाल्यास मी त्याला सांगेन की जेवढेही समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षक आहेत, त्यांनी भावी पिढीला अलादिनच्या दिव्याची कहाणी सांगणं बंद करावं आणि विद्यार्थ्यांना परिश्रम घेण्याचे शिक्षण द्यावे - पंतप्रधान मोदी

7. सरकारतर्फे आमदारांना कमी दरात एक प्लॉट मिळतो. तो प्लॉट मी पक्षाला देण्याच्या विचारात आहे. पण यामध्ये काही नियम असून हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. यातील काही गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर संबंधित प्लॉट पक्षाच्या नावावर करेन - पंतप्रधान मोदी

8. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलाखतीदरम्यान एक विनोददेखील सांगितला. 'एकदा स्टेशन एक ट्रेन आली. तेव्हा वरच्या सीटवर झोपलेल्या एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशाला विचारलं, कोणतं स्टेशन आलं आहे?. तेव्हा उत्तर देणाऱ्यानं म्हटलं की, चार आणे द्या मग सांगतो कोणतं स्टेशन आलं आहे. तेव्हा प्रवासी म्हणाला सांगायची गरज नाही, मला समजलंय अहमदाबाद आलं आहे' - पंतप्रधान मोदी

9. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्याकडे बँक खातं नव्हतं. आमदार होण्यापूर्वी माझं बॅंकेत खातं नव्हतं. जेव्हा आमदार झालो तेव्हा वेतन मिळू लागलं. शाळेत असताना देना बँकेचे कर्मचारी आले होते. त्यांनी मुलांना पैसे ठेवण्यासाठी गल्ले दिले होते आणि सांगितलं होतं की यामध्ये पैसे साठवून बँकेत जमा करा. पण तेव्हा पैसेच नव्हते. तेव्हापासून बँक खातं बंदच होतं. - पंतप्रधान मोदी

10. ममता दीदी वर्षातून एक-दोन कुर्ते आजही मला पाठवतात. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वर्षातून तीन-चार वेळा ढाका येथील मिठाई आठवणीनं पाठवतात. ममता दीदीदेखील मला मिठाई पाठवतात -पंतप्रधान नरेंद्र मोदी

11. मी स्वतःचं जीवन शिस्तबद्ध केलं आहे - पंतप्रधान मोदी

12. मी Human Resource Development मध्ये माझं आयुष्य घालवलं आहे. कामाच्या वेळी मी केवळ कामच करतो. वेळ वाया घालवत नाही - पंतप्रधान मोदी

13. लहान असतानाच मी सर्व मोहमाया सोडल्या आहेत - पंतप्रधान मोदी

14. भारतीय लष्करात प्रवेश घेण्याचे माझं स्वप्न लहानपणापासून होतं. मी कडक शिस्तीचा आहे, पण मी कोणालाही कमीपणा दाखवत नाही- पंतप्रधान मोदी

15. आई आमच्याकडून कधीही कोणतीच अपेक्षा करत नाही. आजही मला आई सव्वा रूपया देते.
अक्षय कुमारनं पंतप्रधान मोदींची घेतलेली ही मुलाखत पूर्णतः अराजकीय होती.

VIDEO : 3 वर्षांच्या मुलाला शाळेतून घरी सोडलं, कार पुढे जाताच चाकाखाली सापडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 09:58 AM IST

ताज्या बातम्या