आधी राज्यांशी बोलणार मग कोरोना लशीची किंमत ठरवणार; पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय

आधी राज्यांशी बोलणार मग कोरोना लशीची किंमत ठरवणार; पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय

कोरोनाच्या 8 लशींवर वेगानं काम सुरू, किंमतीबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी

  • Share this:

नवी दिल्ली, 04 डिसेंबर : ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यात नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. पण भारतातील नागरिकांना कोरोनाची लस कधी मिळणार आणि किंमत किती असणार हा प्रश्न पडला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व पक्षांची बैठक घेतली. कोरोना लशीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक असल्याचं सांगितलं जात आहे

कोरोना आणि लशीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या बैठकीत लशीबद्दल मोठी माहिती दिली आहे. कोरोनाच्या लशीचं काम वेगानं सुरू आहे. 8 लशींवर सध्या वेगानं काम सुरू असून लवकरच त्या उपलब्ध होणार आहेत. येत्या आठवड्यांमध्ये ही लस येणे अपेक्षित आहे. कोरोना लस प्रथम वृद्ध, कोरोना वॉरियर्सना दिली जाऊ शकते, असे पंतप्रधान मोदींनी सूचित केलं आहे.

हे वाचा-कोरोना पॉझिटिव्ह असूनही विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा,या देशातील धक्कादायक प्रकार

सर्वपक्षीयांच्या बैठकीत पीएम मोदी म्हणाले की आठ लशींवर सध्या काम सुरू आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये लसीबाबत चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे. शास्त्रज्ञांकडून मान्यता मिळाल्यानंतर लवकरच त्यावर काम सुरू होईल. भारत एका विशेष सॉफ्टवेअरवर काम करत आहे जे प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहोचते का यावर लक्ष ठेवेल.

लशीचं वितरण कसं करता येईल आणि त्याचं स्टोअरेज करण्यासाठी कसं नियोजन करता येईल यावर सध्या काम सुरू आहे. कोरोनाच्या लशीची किंमत किती असावा याबाबत सर्व राज्यांसोबत चर्चा करू आणि केंद्र आणि सर्व राज्यांसोबत चर्चा करून या लशीची किंमत किती असेल याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 4, 2020, 2:28 PM IST

ताज्या बातम्या