S M L

'आता परीक्षेची वेळ आली आहे', मोदींकडून निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

'तुमच्या घरावर भाजपचा झेंडा लावा. तुमचा झेंडा तुमच्यापेक्षाही उंच असला पाहिजे.'

Updated On: Feb 28, 2019 01:12 PM IST

'आता परीक्षेची वेळ आली आहे', मोदींकडून निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे. 'आता आपल्या परीक्षेची वेळ आली आहे,' असं म्हणत मोदींनी एकप्रकारे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना 'मेरा बूथ सबसे मजबूत' या निवडणूक अभियानाची सुरुवात केली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने किमान दोन परिवारांशी जोडलं गेलं पाहिजे. सरकारने केलेली काम लोकांपर्यंत घेऊन जा. तुमच्या घरावर भाजपचा झेंडा लावा. तुमचा झेंडा तुमच्यापेक्षाही उंच असला पाहिजे,' असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांनी देशातील सद्यस्थितीबाबत भाष्य केलं आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?

Loading...

सध्या आपली परीक्षेची वेळ आली आहे

कोट्यवधी भारतीयांच्या समर्थनानं सैन्याला जास्त जोश मिळतो

प्रत्येक भारतीयानं आपापल्या परीनं योगदान द्यावं

शत्रूंना आपली प्रगती पाहावत नाही म्हणून ते कुरापती करत आहेत

भारत एकीनं लढणार आणि एकीनंच जिंकणार

आपला देश सुरक्षित हातात आहे


VIDEO : पाकनं सीमेवरच रोखली समझौता एक्सप्रेस; प्रवाशांना भावना अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 01:12 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close