मराठी बातम्या /बातम्या /देश /

Narendra Modi : लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेत उत्साहाचं वातावरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi : लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेत उत्साहाचं वातावरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो - Shutterstock)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो - Shutterstock)

PM Narendra Modi Live speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत आहेत.

  • Published by:  Sunil Desale

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशवासियांना संबोधित करत आहेत. कालच भारताने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार असल्याचं ट्विट सकाळी सात वाजता पीएमओकडून करण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडण्याचं सांगत सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. त्यासोबतच भारतीय कंपन्यांत सुरू असलेली गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेत असलेलं उत्साहाचं वातावरण यावर भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संबोधन

" isDesktop="true" id="621411" >

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

स्वच्छ भारतप्रमाणेच स्वदेशी वस्तूंसाठी चळवळ उभारली पाहिजे

'मेड इन इंडिया'ची ताकद काय आहे याचादेशाला अनुभव येत आहे

जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत हत्यार खाली ठेवू नका, मोदींचा सल्ला

सणवार तोंडावर आहेत, अर्थव्यवस्थेत सकारात्मक चित्र दिसेल

गतीशक्ती योजना भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी उभारी देणार

लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेत उत्साहाचं वातावरण आहे

भारतातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे

को-विन अॅपच जगभरातून कौतुक सुरू आहे

लसीकरण मोहीम राबवताना भारताने विज्ञानाची कास सोडली नाही

अतिशय वेगाने लसीकरण पूर्ण करण्यासाठी योग्य यंत्रणा उभारली

थाळी वाजवून, दिवे प्रज्वलित करुन भारताने एकतेचं दर्शन घडवलं

लसीकरण मोहिमेत व्हीआयपी कल्चरचा शिरकाव करु दिला नाही

कोणताही भेदभाव न करता विक्रमी लसीकरण करुन दाखवलं आहे

'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' यशस्वी करुन दाखवलंय

लसीकरणावरुन विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण जगाला दिलंय

भारत कोरोनापासून सुरक्षित आहे हे आपण जगाला दाखवून दिलं आहे

ज्या वेगाने 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण झाला त्यामुळे जगभरात भारताचं कौतुक

नवीन भारताचं संपूर्ण जगाला दर्शन घडलंय

मी संपूर्ण भारताचं मन:पूर्वक अभिनंदन करतो

130 कोटी जनतेच्या सहकार्यामुळेच 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा आपण ओलांडला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनाला सुरुवात

कोरोना काळात 9 वेळा संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात एकूण 9 वेळा देशवासियांना संबोधित केलं आहे.

पहिल्यांदा - 19 मार्च 2020

दुसऱ्यांदा - 24 मार्च 2020

तिसऱ्यांदा - 3 एप्रिल 2020

चौथ्यांदा - 14 एप्रिल 2020

पाचव्यांदा - 12 मे 2020

सहा - 30 जून 2020

सात - 20 ऑक्टोबर 2020

आठ - 20 एप्रिल 2021

नऊ - 7 जून 2021

भारतानं ओलांडला 100 कोटी लसीकरणाचा टप्पा

भारतातील कोरोना लसीकऱणाचा आकडा 100 कोटींच्या पार पोहोचला आहे. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर केवळ 279 दिवसांत हा विक्रम घडला आहे. भारतात दहा महिन्यांपूर्वी 16 जानेवारी 2021 या दिवशी लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर भारतानं हा विक्रम पूर्ण केला आहे.

जगातल्या सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेतील हा मैलाचा दगड. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 जानेवारी 2021 रोजी ही देशव्यापी मोहीम सुरू केली होती. या वर्षभरात देशातल्या 944 दशलक्ष प्रौढांचं लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत यांपैकी 75 टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. 31 टक्के नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

कुठल्या राज्यात सर्वाधिक लसीकरण?

सर्वाधिक लसीकरण झालेल्या राज्यांच्या यादीत लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात मोठ्या राज्यांचा समावेश आहे. सर्वाधिक लसीकरण उत्तर प्रदेश झालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 12,21,60,335 डोस दिले गेले आहेत. तर महाराष्ट्रात 9,32,25,506 डोस देण्यात आले आहेत. तिसरा नंबर पश्चिम बंगालचा आहे. बंगालमध्ये आतापर्यंत 6,85,28,936 डोस देण्यात आले आहेत. तर गुजरातमध्ये 6,76,87,913 डोस देण्यात आले आहेत.

या राज्यांत 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

देशातील काही राज्यांमध्ये 100 टक्के नागरिकांना पहिला डोस देण्याचं काम पूर्ण झालं आहे. यामध्ये सिक्कीम, गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, चंदीगढ, लक्ष्यद्वीप, दादरा नगर हवेली या राज्यांचा समावेश आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, India, Narendra modi