मराठी बातम्या /बातम्या /देश /

Happy Birthday PM Modi: नरेंद्र मोदी कल्पना सत्यात उतरवणारा नेता

Happy Birthday PM Modi: नरेंद्र मोदी कल्पना सत्यात उतरवणारा नेता

Modi Magic:  पंतप्रधान मोदींच्या 71व्या वाढदिवसानिमित्त (Narendra Modi Birthday) अशा गोष्टी ज्यांमुळे गेली कित्येक वर्षं देशातल्या नागरिकांवर हे ‘मोदी मॅजिक’ (Modi Magic) टिकून आहे

Modi Magic: पंतप्रधान मोदींच्या 71व्या वाढदिवसानिमित्त (Narendra Modi Birthday) अशा गोष्टी ज्यांमुळे गेली कित्येक वर्षं देशातल्या नागरिकांवर हे ‘मोदी मॅजिक’ (Modi Magic) टिकून आहे

Modi Magic: पंतप्रधान मोदींच्या 71व्या वाढदिवसानिमित्त (Narendra Modi Birthday) अशा गोष्टी ज्यांमुळे गेली कित्येक वर्षं देशातल्या नागरिकांवर हे ‘मोदी मॅजिक’ (Modi Magic) टिकून आहे

अमीश देवगण “विक्रमी पुरुष, सिर पर, चलता न छत्र पुरखों का धर अपना बल-तेज जगाता है, सम्मान जगत से पाता है” कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या या ओळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अगदी चपखलपणे वापरता येतात. गुजरातच्या एका लहानशा गावातला चहावाला, ते राज्याचे मुख्यमंत्री आणि अखेर देशाचे मजबूत पंतप्रधान! मोदींचा हा प्रवास (Narendra Modi journey) अगदीच थक्क करणारा आहे. मोदी म्हणतात, “आपण काही करण्याचं एकदा ठरवलं, तर ते मिळवण्यासाठी आपण कितीही प्रवास करू शकतो.” त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि अशा शब्दांमुळे लोकांमध्येही एक प्रकारचा आत्मविश्वास जागा होतो. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांमध्ये पहिल्यांदाच देशाला मोदींच्या रूपाने असा पंतप्रधान मिळाला आहे, ज्याचा ‘यूएसपी’ (Narendra Modi USP) हा इतर नेत्यांप्रमाणे खोटी आश्वासनं नाही, तर स्वतःच्या नव्या कल्पना राबवून त्या यशस्वीपणे पूर्ण करणे हा आहे. आज, पंतप्रधान मोदींच्या 71व्या वाढदिवसानिमित्त (Narendra Modi Birthday) मी अशा काही गोष्टींचं विश्लेषण करणार आहे, ज्यांमुळे गेली कित्येक वर्षं देशातल्या नागरिकांवर हे ‘मोदी मॅजिक’ (Modi Magic) टिकून आहे आणि पुढेही कित्येक वर्षं टिकून राहील. कोरोना काळातही लोकांचा मोदींवर असलेला विश्वास कायम राहिला, हे कशामुळे? तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात सर्वेक्षण केलं, तर तुम्हाला हेच लक्षात येईल, की हा मोदी फॅक्टर (Modi Factor) किती मोठा आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एक पत्रकार म्हणून मी कित्येक जणांशी बोललो. केवळ त्यांचं एकूण परिस्थितीबाबत मत जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याशी चर्चा केली. त्या सर्वांमध्ये एका गोष्टीबाबत एकमत होतं, ते म्हणजे जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, तोपर्यंत जास्त चिंता कऱण्याची गरज नाही. मोदीजी लवकरच काहीतरी उपाय घेऊन येतील आणि वाईट दिवस दूर होतील, असं त्यांचं म्हणणं होतं. मोदींनी अगोदर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि पुढे सात वर्षं देशाचे पंतप्रधान म्हणून केलेलं काम हेच त्यांच्या मोदींवरील या विश्वासाचं कारण होतं. त्यामुळेच संकटकाळात मोदी देशाला तारतील (People trust Modi) असा विश्वास त्या लोकांना होता. मोदी सरकार सर्व शेतकऱ्यांना देणार KCC, अशाप्रकारे करा अर्ज आणि मिळवा फायदा दुसऱ्या लाटेमधले म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यातले दिवस आठवा आणि आत्ताची देशातली परिस्थिती पाहा. केंद्र सरकारच्या कोरोना लसीकरण अभियानामुळेच देशातली परिस्थिती वेगाने पूर्ववत होत आहे. अवघ्या चार महिन्यांच्या काळात देशात कोरोना लशींचे 75 कोटी डोसेस देण्यात आले आहेत. आपल्या लसीकरण अभियानाने अगदी अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. यामुळेच लोकांचा मोदींवरचा विश्वास अढळ आहे. एक पत्रकार म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये मी आजपर्यंत असा नेता पाहिला नाही, ज्याच्यावर लोकांचा एवढ्या प्रमाणात विश्वास आहे. याचाच अर्थ, मोदी (PM Modi Vaccination) नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणेच काम करत आहेत. अद्वितीय कल्पना हे मोदींचं वैशिष्ट्यं नरेंद्र मोदी हे इतर पंतप्रधानांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत, कारण ते अनावश्यक पारंपरिक प्रोटोकॉल टाळतात. लोकांच्या दारापर्यंत प्रशासन पोहोचवणं हा त्यांचा हेतू आहे. यासाठी त्यांनी ही व्यवस्था सुस्त करणारे बरेच अडथळे दूर केले. उदाहरण (Narendra Modi innovative ideas) द्यायचं झाल्यास, अनावश्यक कायदे रद्द करणं, लोकांच्या बँक खात्यांमधल्या अनुदानासाठी डीबीटी लागू करणं, तंत्रज्ञानाचा वापर करून मध्यस्थांना दूर करणं असे बरेचसे निर्णय मोदींनी लोकांसाठी घेतले. मोदींनी मांडलेल्या आणि करून दाखवलेल्या कित्येक कल्पनांबाबत बोलण्याचीही हिंमत कित्येक नेत्यांमध्ये नाही, यामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे सिद्ध होतात. स्वच्छ भारत अभियान स्वच्छतेला दैनंदिन जीवनाचा भाग करावं, अशी कल्पना मोदींच्या अगोदर कोणत्याही राजकीय नेत्याला सुचली नसावी; मात्र मोदींनी आत्मविश्वासाने ही कल्पना लाल किल्ल्यावरून सर्व भारतीयांना ऐकवली आणि देशाला हागणदारीमुक्त (Swachh Bharat Abhiyan) करण्याचा निर्धार जाहीर केला. मोदींचं हे अभियान एवढं यशस्वी ठरले, की आता स्वच्छता आणि टापटीपपणा हा भारतीयांच्या सवयीचाच एक भाग झाला आहे.

PM Narendra Modi birthday: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 71 वा वाढदिवस, भाजपची जोरदार तयारी

 देशाला यापूर्वी लाभलेले बहुतांश पंतप्रधान हे केवळ घोषणाबाजीवर भर देणारे होते. मोदींनी मात्र तसं न करता आपल्या कल्पना आणि योजना तातडीने राबवण्यास सुरुवात केली. या स्वच्छता अभियानामध्ये कित्येक शहरांना ग्रँट आणि क्रमांक देण्यात आले, जे त्या-त्या शहरातल्या स्वच्छतेच्या प्रमाणावर आधारित होते. त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या चढाओढीमध्ये प्रत्येक शहर स्वच्छ होत गेलं आणि मोदींचं अभियान यशस्वी झालं. याचाच परिणाम म्हणून 2014 पूर्वीच्या तुलनेत आता भारतात अधिक स्वच्छ शहरं आहेत. शिवाय आता देशात एकही असं गाव नाही, जिथे शौचालय नाही.
शौचालयासाठी अभियान यातूनच आपण मोदींच्या दुसऱ्या अभियानाकडे वळू या. ते म्हणजे हागणदारीमुक्त भारत. 2014 पूर्वी देशातल्या सुमारे 60 टक्के गावांमध्ये घराघरात शौचालय नव्हतं. त्यामुळे कित्येक पिढ्या नागरिकक उघड्यावरच मलमूत्र विसर्जन करत. यांपैकी कित्येकांना गरिबीमुळे शौचालय बांधता येत नव्हतं. घरी शौचालय नसल्याचा सर्वाधिक तोटा महिलांना बसत होता. यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत होतं. केंद्र सरकारच्या योजनेमुळे अशा सर्व व्यक्तींना शौचालय बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध झालं. ज्यांचा गरिबीचा प्रश्न होता त्यांना तर मोदींनी मदत केलीच; मात्र देशातल्या कित्येक नागरिकांची शौचालय बांधण्याची इच्छाच नव्हती. पंतप्रधान मोदींनी कित्येक प्रचारसभांमध्ये, मोहिमांमध्ये लोकांमध्ये याबाबत जनजागृती केली. यामुळेच आज देशातल्या 95 टक्के घरांमध्ये शौचालय आहे. मन की बात मोदींच्या आयडियांपैकी एक म्हणजे, मन की बात हा रेडिओ कार्यक्रम. लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांना सहजपणे उपलब्ध असणाऱ्या रेडिओची (Mann Ki Baat) मदत घेतली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमामुळे रेडिओलाही नवसंजीवनी मिळाली. गेल्या सात वर्षांपासून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम पार पडतो आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकांदरम्यानचा काळ सोडला, तर मोदीजी अविरतपणे जनतेशी संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम एकतर्फी नसतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदीजी जनतेमधून कल्पना मागवतात आणि त्या देशासमोर मांडून जनतेला त्यात सहभागी करून घेतात. विद्यार्थी संवाद इतर कोणत्याही पंतप्रधानाने राबवलं नसेल, असं हे आणखी एक अभियान. विद्यार्थ्यांना परrक्षेचा ताण वाटू नये यासाठी ते लहान-मोठ्या अशा सर्व वयोगटातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. लहान मुलांशी आणि तरुणांशी असं नातं असलेला हा एकमेव नेता असावा. आरोग्य स्वच्छतेप्रमाणेच आरोग्याबाबतही जनजागृती करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान असावेत. आपलं आरोग्य चांगलं ठेवावं यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याचं काम ते करतात. आज मोदींमुळेच आपल्याकडचा ‘योग’ जगभरात वेगाने पसरतो आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची संकल्पनाही मोदींनी पुढे आणली आणि यशस्वीपणे राबवली. या सगळ्यामुळेच ते आता ‘फिटनेसचे ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणूनही ओळखले जातात. स्पोर्ट्स कल्चर अगदी 2014 पासूनच पंतप्रधान मोदी देशातल्या खेळाडूंना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आले आहेत. देशातल्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करावी असं त्यांचं स्वप्न आहे. यासाठी विविध पातळीवर मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा किती फायदा होतोय, हे आपण आताच्या टोकियो ऑलिम्पिक्स आणि पॅरालिम्पिक्समध्ये पाहिलंच. या वर्षी झालेल्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. आता सर्वसामान्य नागरिकही थेट पंतप्रधानांकडे करू शकतील तक्रार; सोपी आहे प्रक्रिया गोल्डन बॉय नीरज चोप्राला भारतासह इतर देशांमध्ये प्रशिक्षण उपलब्ध करून देणं, मेन्स आणि विमेन्स हॉकी टीमलाही चांगलं प्रशिक्षण उपलब्ध करून देणं याबाबत मोदींनीच (Modi Sports culture) निर्देश दिले होते. याव्यतिरिक्त, ज्यांना मेडल्स मिळाली नाहीत, त्यांनाही वेळोवेळी फोन करून पंतप्रधानांनी आधार दिला आहे, यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो. पद्म पुरस्कार 2014पूर्वी देशात पद्म पुरस्कार केवळ त्यांनाच दिले जात, जे केंद्र सरकारच्या विचारसरणीला मानत; मात्र मोदी सत्तेवर आल्यानंतर हे सगळं बंद झालं. मोदींच्या काळात हे पुरस्कार खऱ्या अर्थाने ‘लोकांसाठीचे पुरस्कार’ झाले. मोदींच्या काळात अशा लोकांना पद्म पुरस्कार दिले गेले, ज्यांचं कार्य यापूर्वी कधीही इतरांपर्यंत पोहोचले नव्हते. गेल्या सात वर्षांमधल्या पद्म पुरस्कारांची यादी पाहिली, तर लक्षात येईल की यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजाभाव किंवा पार्शालिटी करण्यात आली नाही. आत्मनिर्भर भारत देशाला मजबूत बनवणं हे कोणत्याही पंतप्रधानाचे कर्तव्य असतं. देशाचा स्ट्राँग पॉइंट ओळखून, लोकांमध्ये आत्मविश्वास जागा करण्याचं कामही एका नेत्यानं केलं पाहिजे. मोदींची ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ (Atmanirbhar Bharat and Modi) ही अभियानं एका नेत्याने करायलाच हवीत अशी आहेत. या अभियानांमुळे आपला देश पुढील कित्येक वर्षे खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ होणार आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कालावधीत परराष्ट्र गुंतवणूक सरासरी 30 बिलियन डॉलर्स एवढी होती. मोदींच्या कार्यकाळात ती 65 बिलियन डॉलर्स झाली आहे. सुरक्षित आणि मजबूत भारत दहशतवादी हल्ले, पाकिस्तान आणि चीनच्या कुरापती या सर्वांना चोख प्रत्युत्तर देण्याचं काम मोदींनी केले आहे. आधी सर्जिकल स्ट्राइक आणि मग बालाकोट एअर स्ट्राइक यांमधून पंतप्रधान मोदींनी दाखवून दिलं, की भारत हा डिवचल्यानंतर शांत बसणारा देश नाही. हा नवभारत आहे, जो घरात घुसून प्रत्युत्तर देतो. पाकिस्तानवर केलेल्या कारवाईमुळे चीनलाही सीमेपासून मागे हटावं लागलं आणि हे मोदींच्या निर्णयक्षमतेचंच यश म्हणावं लागेल. यामुळेच गेल्या सात वर्षांमध्ये देश अधिक मजबूत आणि अधिक सुरक्षित झाला आहे. इतर अनेक कल्पना; ज्यांमुळे देश घडला मोदींच्या वर उल्लेख केलेल्या कल्पना या हिमनगाचे केवळ टोक होत्या. यांव्यतिरिक्त अनेक योजना त्यांनी लोकांसमोर मांडल्या आणि यशस्वीपणे राबवल्याही. ‘उज्ज्वला योजना’, ज्यामार्फत मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजना, ज्यामार्फत लोकांना मुलगा-मुलगी एकसमान असल्याची शिकवण मिळाली आणि कित्येक मुलींना शिक्षण मिळालं. मोदींच्या कालावधीमध्ये अंतराळ संशोधानालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. मंगळयान, चांद्रयान अशा अनेक योजना आहेत. मोदींची आणखी एक सवय आहे, जी नक्कीच कौतुकास्पद आहे, ती म्हणजे त्यांचा आळसाप्रति असलेला तिरस्कार. ज्या विकासकामांचं आपण उद्घाटन केलं आहे, ती आपल्याच कार्यकाळात पूर्ण व्हावीत याकडे त्यांचा कल असतो. यामध्ये मग वाराणसीमधला काशी कॉरिडॉर, दिल्लीमधलं आंबेडकर सेंटर, कावडियामधला सरदार पटेलांचा पुतळा ही अशी काही उदाहरणं. मोदींकडे अभिनव कल्पनांचा मोठा बटवा आहे, ज्यातल्या कित्येक आयडिया अजून बाहेरही आल्या नाहीत. त्यांच्या सात वर्षांच्या कारकीर्दीमध्ये काही चढ-उतार आले; मात्र यामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास डळमळला नाही. लोकांचा एवढा विश्वास आणि एवढ्या अपेक्षा असलेला दुसरा कोणताही नेता सध्या भारतात नसेल. वयाच्या 71व्या वर्षीही त्यांच्यात असलेली अफाट ऊर्जा ही आश्चर्यकारक आहे. त्यापेक्षा आश्चर्यकारक आहे तो म्हणजे लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास. यामुळेच जेव्हा ते म्हणतात, “मैं देश नहीं झुकने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा” तेव्हा भारतातला प्रत्येक नागरिक त्यांच्यावर विश्वास ठेवतो. अशा या मोदींची आपल्याला आणि देशाला भरपूर गरज आहे. त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्याच्या भरपूर सदिच्छा. मोदींनी केलेलं कार्य पाहता मला रामधारी सिंह दिनकर यांची आणखी एक ओळ आठवतेय, जी मोदींसाठी चपखलपणे वापरता येईल – “कुल-गोत्र नहीं साधन मेरा, पुरुषार्थ एक बस धन मेरा.”
First published:

Tags: Narendra modi

पुढील बातम्या