#withoutfilter, मोदी म्हणाले माझ्याशी without filter बोला!

#withoutfilter, मोदी म्हणाले माझ्याशी without filter बोला!

तुम्ही जसं तुमच्या मित्राशी बोलता तसंच माझ्याशीही बोला अशी इच्छा मोदींनी व्यक्त केली

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जानेवारी : ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात देशभरातील विविध विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परीक्षेसंदर्भात प्रश्न विचारले. यावेळी मोदींनी त्यांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची उदाहरणं देऊन प्रेरित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मोदींनी तरुणांच्याच भाषेत म्हणजेच विद्यार्थ्यांना #withoutfilter बोलण्याचे आवाहन केले. मी तुमचा मित्र, साथीदार आणि मदतगार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या बोलण्याचे ओझे घेऊ नका. तुम्ही जसं तुमच्या मित्राशी बोलता तसंच माझ्याशीही बोला. तुमच्याकडून काही चूक झाली तरी हरकत नाही. माझ्याकडून चूक झाली तर माध्यमांना मजा येईल. मात्र सुदैवाने मी त्यांना ती संधी देणार नसल्याचे वक्तव्य़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात परीक्षांमुळे येणाऱ्या तणावाचा सामना कसा करावा, यासंदर्भात ते मार्गदर्शन करीत आहेत. भारतातील तब्बल 2 हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. HRD Ministry ने MyGovच्या संयुक्त विद्यमाने पाच विविध विषयांवर 9 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या निबंध स्पर्धेतील 1,050 विद्यार्थ्यांची निव़ड परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी करण्यात आली.

सध्याच्या परिस्थितीत परीक्षेतील गुणांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं जात आहे. सध्या गुण हा परीक्षेचा मापदंड बनला आहे. मात्र परीक्षा ही केवळ एक   महत्त्वपूर्ण पायरी आहे, संपूर्ण जीवन नव्हे. गुणांना अधिक महत्व देणं किवा परीक्षा ही केवळ गुणांचा विचार करुन देणं चुकीचं आहे. सध्या तुम्हा कोणतंही क्षेत्र खुलं आहे. शेतकरी जरी फार शिक्षित नसला तरी तो आपल्या अनुभवाने, मेहनतीने शिकतो व जीवन समृद्ध करतो. परीक्षा महत्त्वाची, मात्र परीक्षाच जीवन आहे, या विचारातून बाहेर यायला हवं; असं मोदी यावेळी म्हणाले.

First published: January 20, 2020, 12:59 PM IST

ताज्या बातम्या