PM मोदी म्हणतात, मतदान केंद्रावर 'टोटल धमाल' करा

PM मोदी म्हणतात, मतदान केंद्रावर 'टोटल धमाल' करा

पंतप्रधान मोदींनी 16 ट्वीटमध्ये केलं 40 जणांना टॅग

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. यात लोकांनी मतदान करावे यासाठी पंतप्रधान मोदींनी बॉलीवूड स्टार आणि खेळाडूंनी प्रेरणा द्यावी असं म्हटल आहे.

पंतप्रधान मोदींनी 'मतदान करा' या अभियानाची सुरुवात करताना 16 ट्वीट केली आहेत. यात त्यांनी जवळपास 40 जणांना टॅग केलं आहे. मोदींनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, माझ्या सहकारी भारतीयांनो, मतदान करा असा आवाज देण्याची वेळ आली आहे. येता निवडणुकीत तुम्ही, तुमचे कुटुंबिय आणि मित्रांनाही मतदानासाठी प्रेरणा द्या. यामुळे देशाच्या भविष्यावर सकारात्मक परिणाम होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये अनुपम खेर, कबीर बेदी, ऋतिक रोशन, आर माधवन, शेखर कपूर यांना टॅग केलं आहे. त्यांनीही मतदारांना प्रेरणा द्यावी असं मोदींनी म्हटलं आहे.

ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदींनी टोटल धमाल या चित्रपटाच्या कलाकारांनाही टॅग केलं आहे. आता मतदान केंद्रावर टोटल धमाल करण्याची वेळ आहे असं मोदींनी म्हटलं.

याआधीही मोदींनी देशातील मान्यवर आणि प्रसिद्ध व्यक्तींनी मतदान जनजागृती करावी असं म्हटलं होतं. यात त्यांनी दिग्दर्शक मधुऱ भांडारकर, विवेक अग्निहोत्री, राजकुमार या बॉलीवूडमधील स्टार्सचा समावेश होता. तर शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, हिमा दास, दीपा करमारकर, साक्षी मलिक यांनाही टॅग केले होते.

VIDEO: जेव्हा शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 08:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading