मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान मोदींचं भारतीयांना New Year Gift! अवघ्या पाच लाखांत पूर्ण होणार स्वत:च्या घराचं स्वप्न...

पंतप्रधान मोदींचं भारतीयांना New Year Gift! अवघ्या पाच लाखांत पूर्ण होणार स्वत:च्या घराचं स्वप्न...

विशेष म्हणजे वर्षभरात या प्रकल्पाअंतर्गत घरे तयार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे वर्षभरात या प्रकल्पाअंतर्गत घरे तयार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे वर्षभरात या प्रकल्पाअंतर्गत घरे तयार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 1 जानेवारी : स्वत:च घर असावं हे प्रत्येक नागरिकाचं स्वप्न असतं. यासाठी तो दिवस-रात्र मेहनत करतो व पैसे जमा करुन आपल्या हक्काचं घर उभं करतो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शहरात राहणाऱ्या गरीबांसाठी पंतप्रधान मोदींनी एक चांगली बातमी आणली आहे. पीएम नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुक्रवारी (1 जानेवारी 2021) सहा राज्यात ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज इंडिया (GHTC-India) अंतर्गत लाइट हाउस (एलएचपी ) योजनेचा पाया रचणार असल्याची घोषणा केली आहे. (owning a home will be fulfilled in just less then five lakhs) पावणे पाच लाखांत मिळेल घर हरित निर्माण योजनेचा उपयोग करीत शहरातील गरीबांना छप्पर मिळावं यासाठी एलएचपी प्रॉजेक्टअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (ईडब्ल्यूएस) साठी घरे बांधली जात आहेत. त्याअंतर्गत 415 चौरस फूटाचे फ्लॅट्स शहरातील गरीबांना (ईडब्ल्यूएस) अवघ्या पावणे पाच लाख रुपयांत देण्यात येणार आहेत. काय असेल घरांच्या किमती? मिळालेल्या माहितीनुसार घरांच्या किंमती 12.59 लाख रुपये आहेत. ज्यात केंद्र आणि प्रदेश सरकारकडून 7.83 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाईल. उरलेले 4.76 लाख रुपये लाभार्थींना द्यावे लागेल. फ्लॅटचा हक्क प्रधानमंत्री आवास योजनेनुसार (शहरी) मिळेल. लाइट हाउस प्रॉजेक्टची खासियत 34.50 वर्ग मीटरचा कार्पेट एरिया 14 मजली टॉवर 1,040 फ्लॅट उभारणार 415 चौरस फूटांचे असतील फ्लॅट एका वर्षात फ्लॅट होणार पूर्ण लखनऊमध्ये प्रकल्पाबाबत उत्तर प्रदेशचे नगर विकास मंत्री आशुतोष टंडन यांनी सांगितलं की, शहीद मार्गावरील अवध विहार योजनेत हा प्रकल्प राबविला जात आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हे बांधकाम सुमारे एक वर्षात पूर्ण होईल. प्री फॅब्रिक्ट मटेरियल वापरणे, बांधकाम अधिक टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल असेल. एलएचपी अंतर्गत केंद्र सरकार इंदूर, चेन्नई, रांची, आगरतला, लखनऊ आणि राजकोट या सहा शहरांमध्ये 1000-1000 हून अधिक घरे बांधणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
First published:

Tags: Narendra modi

पुढील बातम्या