मोदी 2.0: खातेवाटप जाहीर; अमित शहांकडे गृह, राजनाथ यांच्याकडे संरक्षण!

मोदी 2.0: खातेवाटप जाहीर; अमित शहांकडे गृह, राजनाथ यांच्याकडे संरक्षण!

मोदी 2.0 मंत्रिमंडळातील 57 मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मे: राष्ट्रपती भवन परिसरात झालेल्या शानदार सोहळ्यानंतर मोदी सरकारने काम सुरुवात केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची सुरुवात केली असून शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या अन्य देशांच्या अध्यक्ष आणि राष्ट्रप्रमुखांसोबत ते बैठका घेत आहेत. त्याच पाठोपाठ मोदी 2.0 मंत्रिमंडळातील 57 मंत्र्यांना देखील त्यांचे खाते वाटप करून देण्यात आले आहे. दरम्यान, आज संध्याकाळी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. ही बैठक साऊथ ब्लॉगमध्ये होण्याची शक्यता आहे.

अपेक्षेप्रमाणे मोदींनी अमित शहा यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रीपद दिले आहे. तर मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये गृहमंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांच्याकडे यावेळी देशाचे सरंक्षण मंत्रालय देण्यात आले आहे. माजी परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तर निर्मला सीतारमन यांच्याकडे अर्थखाते देण्यात आले आहे.

ही बातमी अपडेट होत आहे

नरेंद्र मोदी, पंतप्रधान-

अमित शहा-गृहमंत्री

राजनाथ सिंग-संरक्षण मंत्री

डॉ. सुब्रमण्यम जयशंकर- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

नितीन गडकरी-रस्ते आणि परिवहन

सदानंद गौडा- रसायन आणि खते

निर्मला सीतारामन- अर्थमंत्री

रामविलास पासवान- अन्न आणि औषध प्रशासन

नरेंद्रसिंह तोमर-कृषी व ग्राम विकास आणि पंचायत राज

रविशंकर प्रसाद - कायदा आणि न्याय, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी

हरसिम्रत कौर बादल- अन्न प्रक्रिया उद्योग

थवरचंद गहलोत- सामाजिक न्याय व सबलीकरण

डॉ. रमेश निशांक- मनुष्यबळ विकास मंत्रालय

अर्जुन मुंडा - आदिवासी कल्याण

स्मृती इराणी - महिला व बालकल्याण, वस्त्रोद्योग खाते

डॉ. हर्षवर्धन- आरोग्य आणि विज्ञान

प्रकाश जावडेकर- पर्यावरण मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पीयूष गोयल- रेल्वे मंत्री, वाणिज्य आणि उद्योग

धर्मेंद्र प्रधान- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू

मुख्तार अब्बास नक्वी-अल्पसंख्यांक मंत्री

प्रल्हाद जोशी- संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री

डॉ. महेंद्रनाथ पांडे- कौशल्य विकास

अरविंद सावंत - अवजड उद्योग मंत्रालय

गिरिराज सिंह - पशुसवंर्धन आणि मत्स पालन

गजेंद्रसिंह शेखावत- जल मंत्रालय

राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार

संतोष गंगवार- कामगार आणि रोजगार मंत्रालय

राव इंद्रजित- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

श्रीपाद नाईक- आर्युवेद आणि योग मंत्रालय

जितेंद्र सिंह- इशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, अणू उर्जा

किरण रिजीजू- क्रीडा आणि युवा कल्याण

प्रल्हादसिंह पटेल- पर्यटन आणि संस्कृती मंत्रालय

आर. के. सिंग- ऊर्जा आणि कौशल्य मंत्रालय

हरदीपसिंग पुरी- बांधकाम आणि नागरी विकास मंत्रालय

मनसुख मांडविया- जहाज बांधणी, रसायन आणि खते राज्यमंत्री

राज्यमंत्री

फग्गनसिंह कुलस्ते- स्टील मंत्रालय

अश्विनीकुमार चौबे- आरोग्य आणि कुटुंब कल्याण

अर्जुनराम मेघवाल- संसदीय कामकाज मंत्रालय

व्ही. के. सिंग- परिवहन मंत्री आणि रस्ते विकास

कृष्णपाल गुर्जर-सामाजिक न्याय

रावसाहेब दानवे- ग्राहक संरक्षण

किशन रेड्डी- गृहमंत्री

पुरुषोत्तम रुपाला- कृषी

रामदास आठवले- सामाजिक न्याय

साध्वी निरंजन ज्योती-ग्रामीण विकास

बाबुल सुप्रियो-पर्यावण आणि वन

संजीव बलियान- पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय

संजय धोत्रे- मनुष्यबळ

अनुरागसिंह ठाकूर-अर्थ

सुरेशचंद्र अंगडी- रेल्वे

नित्यानंद राय- गृह

व्ही. मुरलीधरन- परराष्ट्र व्यवहार

रेणुका सिंह सरुता- आदीवासी

सोम प्रकाश-वाणिज्य आणि उद्योग

रामेश्वर तेली- अन्न प्रक्रिया

प्रतापचंद्र सारंगी- लघु उद्योग

कैलाश चौधरी- कृषी

देबश्री चौधरी- महिला आणि बाल कल्याण

........................

बीडमध्ये EVM बाबत धनंजय मुंडेंचा धक्कादायक दावा, पाहा VIDEO

First published: May 31, 2019, 12:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading