20 जुलै : पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी कोविंद यांच्या कुटुंबियासोबत असलेला 20 वर्षांपूर्वीचा फोटो टि्वट केलाय.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांनी सहज विजय मिळवला. या विजयाबद्दल त्यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन होतंय. पण, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वटकरून खास अभिनंदन केलंय. पहिल्या टि्वटमध्ये त्यांनी कोविंद यांना मिळालेल्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त केलं. तसंच त्यांनी मीरा कुमार यांनी लोकशाही तत्वांचा मान राखत निवडणूक लढवली याबद्दल अभिनंदन केलं.
दुसऱ्या टि्वटमध्ये त्यांनी कोविंद यांच्या कुटुंबियासोबतचा 20 वर्षांपूर्वीचा फोटो टि्वट केला. 20 वर्षांपूर्वी आणि आज असं म्हणत त्यांनी टि्वट केलंय.
20 years ago and the present…always been a privilege to know you, President Elect. pic.twitter.com/IkhnOtYf8N
— Narendra Modi (@narendramodi) July 20, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा