Home /News /national /

'2020 हे वर्ष देशवासियांसाठी आनंदाचे असेल अशी अपेक्षा',पंतप्रधान मोदींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

'2020 हे वर्ष देशवासियांसाठी आनंदाचे असेल अशी अपेक्षा',पंतप्रधान मोदींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

इंग्रजी नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    नवी दिल्ली, 01 जानेवारी : इंग्रजी नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटरवरून शुभेच्छा देताना म्हटलं की, 2020 वर्ष तुमच्यासाठी अद्भुत जावो. या वर्षात तुम्ही आनंदी आणि समृद्ध रहा. तसेच आरोग्य चांगले राहो आणि तुमच्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात. तुम्हा सर्वांना 2020 च्या हार्दिक शुभेच्छा. मोदींनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्याआधी पुर्वसंध्येलासुद्धा काही ट्विट केली होती. यामध्ये त्यांनी 2020 हे वर्ष देशातील लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मोदींनी ट्विटरवर म्हटलं होतं की, एपेक्षा करतो की नवं वर्ष भारताला बदलण्यासाठी लोकांना सशक्त करेल आणि मजबूत करेल. मोदींनी नमो 2.0 या ट्विटर हँडलवरील एका ट्विटला यातून उत्तर दिलं होतं. मोदींनी ज्या ट्विटर युजरला उत्तर दिलं त्यावरून एक व्हिडिओ सुद्धा शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कामाची माहिती देण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी याचे कौतुक केलं आहे. याशिवाय इतरही काही युजर्सना मोदींनी उत्तरे दिली. एका युजरने म्हटलं होतं की, 'तुमचं सरकार तरुणांची शक्ती आणि उत्साह ओळखते. तरुणांच्या नव्या विचारांना, कल्पनांना वाव देते आणि नवा भारत निर्माण करण्याचे काम करते.' याला उत्तर देताना मोदी म्हणाले की, तरुण भारत प्रतिभावान आहे. आम्ही तरुणांना असं वातावरण निर्माण करून देण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यामध्ये ते विकास करू शकतील. मला याचा आनंद आहे. वाचा : जम्मू-काश्मीरला मिळाले 'न्यू ईयर गिफ्ट', केंद्र सरकारने सुरू केली ही सुविधा
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: PM narendra modi

    पुढील बातम्या