आता रात्री 8 ला नाही तर उद्या सकाळी 9 वाजता मोदी देणार स्पेशल मेजेस

आता रात्री 8 ला नाही तर उद्या सकाळी 9 वाजता मोदी देणार स्पेशल मेजेस

नोटबंदी असो वा लॉकडाऊन पंतप्रधान मोदी हे नेहमी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करायचे. पण यावेळी ते सकाळी 9 वाजता देशातील नागरिकांना खास मेसेज देणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 एप्रिल : देशात कोरोनाव्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. अशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. पण यावेळी ते एका नव्या वेळेत देशाशी संवाद साधणार आहे. नोटबंदी असो वा लॉकडाऊन पंतप्रधान मोदी हे नेहमी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करायचे. पण यावेळी ते सकाळी 9 वाजता देशातील नागरिकांना खास मेसेज देणार आहे.

उद्या म्हणजेच शुक्रवारी 9 वाजता सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यासंबंधी ट्वीट करत मोदींनी माहिती दिली आहे. मोदी यावेळी नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या या धोक्यापासून वाचण्यासाठी मोदी वारंवार जनतेशी बोलत आहेत. काही दिवसांआधी त्यांनी फोनद्वारे मन की बात हा कार्यक्रमदेखील केला होता.

खरंतर कोरोनाव्हायरसच्या उद्रेकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांशी चर्चा केली आणि सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र, मिझोरम, दिल्ली, बिहार, तेलंगणा, पुडुचेरी, गोवा, त्रिपुरा, उत्तराखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश या मुख्यमंत्र्यांसह राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशांचे प्रशासक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींशी चर्चेसाठी उपस्थित होते. त्यामुळे या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर शुक्रवारी मोदी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

First published: April 2, 2020, 5:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading