नरेंद्र मोदी मध्य प्रदेशमधून लोकसभा लढवणार, भाजप नेत्याचा दावा

नरेंद्र मोदी मध्य प्रदेशमधून लोकसभा लढवणार, भाजप नेत्याचा दावा

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवतील याबद्दल प्रकाश झा यांनी विधान केलं आहे.

  • Share this:

भोपाळ, 16 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशातील 'गुना या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील' अशी घोषणा भाजपचे राज्यसभा खासदार आणि उपाध्यक्ष प्रभात झा यांनी केली आहे. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी मंचावर उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री स्वतंत्र देव सिंह देखील हजर होते.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता गुनामधून निवडणूक लढवणार का? याची चर्चा सुरू झाली. पण, केवळ कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी प्रभात झा यांनी हे विधान केल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुका या तोंडावर आल्या असून सध्या प्रचार सभांना, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींना वेग येताना दिसत आहे. दरम्यान, भाजपनं देखील विजयासाठी कंबर कसली असून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर आणि रणनिती आखण्यावर भर दिला जात आहे.

काँग्रेसकडे आहे गुना

गुना हा मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. ज्योतिरादित्य शिंदे या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2014 साली काँग्रेसनं ज्या दोन जागा जिंकल्या होत्या त्यापैकी गुना हा एक मतदारसंघ आहे.

2014च्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि बडोदा या दोन ठिकाणावरून निवडणूक लढवली होती. पण, दोन्ही ठिकाणी विजय मिळवल्यानंतर मोदींनी बडोदाची जागा सोडली होती.

लोकसभेचे पडघम

सध्या देशात लोकसभेचे पडघम वाजू लागले असून भाजपनं आता प्रचाराला सुरूवात देखील केली आहे. 2014च्या तुलनेत भाजपला 2019ची लोकसभा निवडणूक कठीण जाऊ शकते असं राजकीय निरिक्षकांचं मत आहे. शिवाय, मित्र पक्षांची नाराजी हा देखील सध्या भाजपसमोरील महत्त्वाचा प्रश्न आहे. यापूर्वी 3 राज्यांमध्ये भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. पण, या निकालांचा कोणताही भाजपच्या विजयावर होणार नाही असा भाजपचा दावा आहे. अद्याप उमेदवारांची घोषणा झाली नसली तरी भाजपनं लोकसभा निवडणुकीची रणनिती आखून त्याप्रमाणे प्रचाराला सुरूवात देखील केली आहे.

VIDEO : पुलवामा हल्ल्यानंतर काय आहे काश्मिरी नागरिकाच्या मनात?

First published: February 16, 2019, 6:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading