कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा, यासोबत महत्त्वाच्या 5 बातम्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा, यासोबत महत्त्वाच्या 5 बातम्या

देशभरातील आजचा महत्त्वाच्या 5 घडामोडी जाणून घ्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जून : कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी आणि राज्यातील परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. वेतनवाढीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. देशभरातील महत्वाच्या घडामोडी थोडक्यात जाणून घ्या.

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद

देशात वाढणाऱ्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून राज्यातील स्थितीची आढवा घेणार आहेत. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस ही चर्चा असणार आहे.

2. हाइड्रोक्सिक्लोरोक्विन औषधाचा प्रयोग करण्यासाठी अमेरिकेनं दिली स्थगिती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: हाइड्रोक्सिक्लोरोक्विन हे औषध प्रभावी असल्याचा दावा केला होता. हे औषध अमेरिकेत पाठविण्यासाठी त्यांनी भारतावरही खूप दबाव आणला. आपातकालीन स्थितीत या औषधाचा वापर करण्यासाठी अमेरिकेनं आता बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचा-रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा कडक लॉकडाऊन, 'या' राज्याने घेतला निर्णय

3. कोरोनाग्रस्त रुग्णांवर असणार तिसऱ्याची नजर, दिल्लीतील रुग्णालयात CCTV

अमित शाह यांच्या निर्देशानंतर कोरोनाग्रस्त रुग्णालयांमध्ये CCTV लावण्याच्या कामाला वेळ आला आहे. कोविड19 रुग्णालयांमध्ये आता रुग्ण आणि डॉक्टरांवर कॅमेऱ्याची नजर असणार आहे.

4. वेतनवाढीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी करावी लागणार प्रतीक्षा

वेतनवाढीबाबत केंद्र सरकारकडून नुकताच एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या वार्षिक मूल्यांकनासाठी (Annual Appraisal) पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागेल.

5. देशात कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरतोय...

सलग तिसऱ्या दिवशी देशभरातील करोना रुग्णांमध्ये 11 हजारांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली. देशात गेल्या 24 तासांत 11 हजार 502 रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या 3 लाख, 32 हजार 424 झाली आहे. गेल्या 24 तासांत 307 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 9,520 वर पोहोचली आहे.

हे वाचा-दिल्ली आणि महाराष्ट्रातील 'त्या' रुग्णांपैकी दर तिसऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण

हे वाचा-सुशांतच्या आत्महत्येनंतर म्हणे अंकिताने डिलीट केली 'ती' पोस्ट; चर्चेला उधाण

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 16, 2020, 7:48 AM IST

ताज्या बातम्या