मराठी बातम्या /बातम्या /देश /PM UN address : 'भारताला निर्णय प्रक्रियेतून किती काळ दूर ठेवणार?' मोदींच्या भाषणातले 11 मोठे मुद्दे

PM UN address : 'भारताला निर्णय प्रक्रियेतून किती काळ दूर ठेवणार?' मोदींच्या भाषणातले 11 मोठे मुद्दे

संयुक्त राष्ट्रसंघात (PM modi UN address) तातडीने बदल करण्याची गरज आहे, अशी स्पष्टोक्ती  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघासमोरच्या (United Nations) जोरदार भाषणात केली. त्यांच्या भाषणातले महत्त्वाचे 11 मुद्दे

संयुक्त राष्ट्रसंघात (PM modi UN address) तातडीने बदल करण्याची गरज आहे, अशी स्पष्टोक्ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघासमोरच्या (United Nations) जोरदार भाषणात केली. त्यांच्या भाषणातले महत्त्वाचे 11 मुद्दे

संयुक्त राष्ट्रसंघात (PM modi UN address) तातडीने बदल करण्याची गरज आहे, अशी स्पष्टोक्ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघासमोरच्या (United Nations) जोरदार भाषणात केली. त्यांच्या भाषणातले महत्त्वाचे 11 मुद्दे

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : जगाने एकत्र येऊन महासाथीशी लढायची वेळ आली आहे, पण तो एकत्रित प्रतिसाद कुठे आहे. संयुक्त राष्ट्रसंघात (PM modi UN address) तातडीने बदल करण्याची गरज आहे, अशी स्पष्टोक्ती  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघातल्या (United Nations) बहुप्रतीक्षित भाषणात केली. आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून Covid-19 सारख्या जागतिक संकटाच्या काळात UN ने काय प्रतिसाद दिला, हे तपासण्याची गरज आहे, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी UN च्या 75 व्या आमसभेच्या निमित्ताने आभासी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांचं भाषण झालं. चीनचे राष्ट्रप्रमुख आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनंतर भारतीय पंतप्रधानांचं भाषण होणार असल्यामुळे त्याकडे होतं. मोदींच्या भाषणाचा रोख प्रामुख्याने विकासाभिमुख राहिला. पण जागतिक शांततेसाठी भारत कटिबद्ध आहे, हे मोदींनी ठासून सांगितलं.

पुढच्या जानेवारीपासून भारत राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी (non permanent member) सदस्य (UN security Council ) म्हणून जबाबदारी पार पाडेल. शांतता, सुरक्षा आणि भरभराट याला भारत कायमच पाठिंबा देत राहील, असं मोदी म्हणाले.

मानवतेच्या शत्रूंविरोध आवाज उठवण्यासाठी भारत कधीच कचरणार नाही, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्र आणि ड्रग्जचा व्यापार यांचा उल्लेख केला.

भारत जेव्हा कुठल्या देशाकडे मैत्रीचा हात पुढे करतो, त्या वेळी तो कुणा तिसऱ्या देशाच्या विरोधात नसतो. विकासासंदर्भात कुठले एकत्रित करार होतात तेव्हा कुठल्या इतर देशाला दुबळं करण्याचा उद्देश नसतो. आम्ही आमच्या विकास यात्रेतला अनुभव साऱ्या जगाला सांगायला तयार आहोत, असं मोदी म्हणाले.

भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि एक जबाबदार लोकशाहीची जबाबदारी आम्ही जाणतो.

मोदींच्या UN मधल्या भाषणातले इतर महत्त्वाचे मुद्दे

- जगातला सर्वांत मोठा लस उत्पादक देश म्हणून भारत जगाला Covid-19 च्या संकटापासून वाचवायचा प्रयत्न करेल

- संयुक्त राष्ट्रसंघात (UN reforms)तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. जागतिक महासाथीच्या काळात हवा तसा एकत्रित प्रतिसाद जागतिक संघटनेकडून का आला नाही?

- UN आमसभेच्या अमृतमहोत्सवानिमित्त या जागतिक संघटनेचे सदस्य देश आपापली भूमिका ओळखून या संघटनेचं महत्त्व अबाधित ठेवायचा प्रयत्न करतील अशी आशा आहे.

- Covid-19 काळातल्या अनुभवावरून आम्ही आत्मनिर्भर भारताचं ध्येय समोर ठेवून काम करत आहोत. भारतात कुठल्याही भेदभावाशिवाय सर्व योजनांचा फायदा प्रत्येक नागरिकाला दिला जातो.

- डिजिटल व्यवहार करणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर आहे. डिजिटल अॅक्सेसमुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता आली आणि सबलीकरण वाढलं आहे

- भारतात 40 कोटी जनतेला 4-5 वर्षांत बँकेच्या व्यवहारांशी जोडणं सोपं काम नव्हतं. एवढ्याच वर्षांत उघड्यावर संडासला बसू नये यासाठी 60 कोटी लोकांना प्रवृत्त करणंही तेवढंच अवघड होतं. भारताने ही दोन्ही आव्हानं पेलली.

-भारतात महिला सबलीकरणासाठी प्रयत्न होत आहेत आणि आम्ही ट्रान्सजेंडर्सच्या अधिकारांबाबतही सजग आहोत.

- महिलांना 26  आठवड्यांच्या भरपगारी मातृत्व रजेचा अधिकार देणारा भारत देश आहे.

First published:
top videos

    Tags: Narendra modi