पंतप्रधान मोदींनी 9वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसंदर्भात केलं महत्वाचं ट्वीट

पंतप्रधान मोदींनी 9वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसंदर्भात केलं महत्वाचं ट्वीट

पंतप्रधान मोदींनी 2020 मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेआधी 9 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचे ट्वीट केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 डिसेंबर : सीबीएसईसह देशातील अनेक राज्यातील बोर्डाच्या परीक्षा दोन-तीन महिन्यांनी सुरू होणार आहेत. अनेक राज्यात तर अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असून आता पूर्व परीक्षासुद्धा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी परीक्षेच्य़ा तयारीला लागले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्वीट केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं की, परीक्षा जवळ आल्या आहेत आणि यासोबतच परीक्षा पे चर्चा सुद्धा. आपणाला एकत्र येऊन हे ठरवायला पाहिजे की परीक्षा तणावमुक्त व्हाव्यात. 9 वी पासून 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक अनोखी स्पर्धा आयोजित कऱण्यात आली आहे. यामध्ये विजेता ठरणाऱ्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षा पे चर्चा 2020 मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींनी सुरू केला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यांच्याशी परीक्षेबाबत चर्चा करतात. हा कार्यक्रम एकाच वेळी सर्वत्र प्रसारीत केला जातो.

2019 मध्येही परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना थेट संवाद साधण्याची संधी मिळाली होती. यात शिक्षक आणि विद्यार्थी यांना सहभागी होता येतं. यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या mygov.in या संकेतस्थळावर जावं लागेल. इथं परीक्षा पे चर्चा अशा अधिकृत संकेतस्थळाची लिंक आहे. यावर जाताच सहभागी होण्यासाठी आवश्यक ती माहिती भरून स्पर्धेत भाग घेता येतो.

Published by: Suraj Yadav
First published: December 5, 2019, 12:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading