Home /News /national /

पंतप्रधान मोदी करणार ‘डिजिटल आरोग्य योजने’चं उद्घाटन, जाणून घ्या फायदे

पंतप्रधान मोदी करणार ‘डिजिटल आरोग्य योजने’चं उद्घाटन, जाणून घ्या फायदे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी ‘डिजिटल आरोग्य योजने’चं उद्घाटन (PM Modi to launch Digitial Health Mission on Monday) केलं जाणार आहे.

    नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी ‘डिजिटल आरोग्य योजने’चं उद्घाटन (PM Modi to launch Digitial Health Mission on Monday) केलं जाणार आहे. केंद्र सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून त्यामुळे देशातील आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडणार असल्याचा विश्वास सरकारला आहे. ही योजना सोमवारपासून संपूर्ण देशभर राबवली जाणार असून देशातील प्रत्येकाला स्वतःचं एक वेगळं आरोग्यकार्ड दिलं जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरवणं शक्य होणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. काय आहे योजना? या योजनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र युनिट हेल्थ ओळखपत्र जारी केलं जाणार आहे. त्या ओळखपत्रात व्यक्तीच्या आरोग्याची पूर्ण माहिती देण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर यांचा वापर करून आरोग्याची माहिती प्रोसेस केली जाईल. त्यामुळे प्रत्येकाच्या कार्डवर त्याच्या आरोग्याबाबतचे अपडेट्स, त्याची मेडिकल हिस्ट्री आणि आरोग्याबाबतचे इतर तपशील समजू शकणार आहेत. एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन झालं आहे का, ते कुठं झालं होतं, त्याला कुठले आजार आहेत, वगैरे माहिती त्या कार्डवर नोंदवण्यात येईल. काही राज्यांत अगोदरपासून योजना ही योजना देशातील काही केंद्रशासित प्रदेशांत अगोदरपासूनच सुरु आहे. अंदमान आणि निकोबार, दादरा आणि नगर हवेली, लडाख, लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे मुख्यत्वे तीन भाग करण्यात आले आहेत. नागरिकांचे कामकाजाबाबतचे तपशील, आरोग्याचे तपशील आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड यांचा यात समावेश असणार आहे. हे वाचा - Indian Army : बर्फ वितळल्यामुळे तब्बल 16 वर्षांनंतर जवानाचा मृतदेह दिसला होणार हे फायदे भविष्यातील आव्हानं लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. यामुळे केवळ रुग्णांना नव्हे, तर डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनाही फायदा होणार आहे. सर्व माहिती डिजिटल स्वरुपात उपलब्ध असल्यामुळे कागदोपत्री आरोग्याचे रेकॉर्ड ठेवण्याचीही गरज संपणार आहे. रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना त्यांची पूर्ण मेडिकल हिस्ट्री पाहता येणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Health, Narendra modi

    पुढील बातम्या