मराठी बातम्या /बातम्या /देश /

चांगल्या भवितव्याबाबत उद्या पंतप्रधान मोदी साधणार संवाद; संपूर्ण जगभरातील नागरिकांचं लक्ष

चांगल्या भवितव्याबाबत उद्या पंतप्रधान मोदी साधणार संवाद; संपूर्ण जगभरातील नागरिकांचं लक्ष

भारतातून चीनला विविध क्षेत्रातून बाहेर काढले जात आहे. या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 21 जुलै : देशभरात सुरू असलेला कोरोनाचा कहर त्याशिवाय चीनसोबत सुरू असलेला वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेची राफेलची तयारी..दुसरीकडे कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रयत्न.. सध्या देशात विविध पातळीवर हालचाली सुरू आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (22 जुलै) अमेरिका-भारत (US-India Business Council)  व्यापार परिषदेतच्या इंडिया आयडियाज समिटला संबोधित करणार आहे.

यूएसआयबीसीला 45 वर्षे पूर्ण होण्याच्यानिमित्ताने आयोजित शिखर संमेलनाकडे जगभरातील लोकांची नजर असेल. शिखऱ संमेलनादरम्यान कोरोना महासाथीच्यानंतर जगात भारत-अमेरिका सहयोग आणि त्यांच्यासंबंधावर चर्चा होईल.

हे वाचा-चीनविरोधात भारतीय वायुसेना आक्रमक; 5 राफेल लढाऊ विमानं करणार तैनात

पंतप्रधान कार्यालयाद्वारे मंगळवारी जारी केलेल्या माहितीनुसार – या वर्षी इंडिया आयडियाज समिटचा विषय चांगल्या भविष्याची तयारी असा असणार आहे. शिखर संमेलनात भारत आणि अमेरिका सरकारच्या अधिकारी, व्यापार आणि समाजातील मोठी व्यक्ती सहभागी होतील. या शिखर संमेलनाचं आयोजन 21-22 जुलैला होईल.

भारत-अमेरिका सहकार्यावर चर्चा

या वर्षीय शिखर संमेलनात संबोधित करण्यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ, वर्जीनियाचे सीनेटर मार्क वार्नर आणि संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे माजी राजदूत निक्की हेली सहभागी होतील.

या परिषदेत अमेरिका आणि भारत एकत्रितपणे एकमेकांना सहकार्य करीत व्यापाराच्या नव्या योजना आखण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतातून चीनला विविध क्षेत्रातून बाहेर काढले जात आहे. या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

First published: