Pm Modi Addressed Nation Today at 5 PM : नवी दिल्ली, 7 जून : PMO ने ट्वीट करुन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार असल्याचं सांगितलं होतं. कोरोना महासाथीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला 8 वेळा संबोधित केलं आहे. हे त्यांचं 9 वे संबोधन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर संवाद साधणार याबाबत मोठी चर्चा सुरू होती. तज्ज्ञांनी केलेल्या अनुमानानुसार पीएम मोदी अर्थकारण, कोरोनानंतरचा परिणाम, तिसरी लाट, कोरोना महासाथीत नागरिकांना सावधतेचं आवाहन याबाबत संवाद साधणार असल्याची चर्चा सुरू होती. (Pm Modi Addressed Nation Today at 5 PM)
दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. यावेळी मोदी म्हणाले की, कोणत्याही राज्याला लसीकरणासाठी खर्च करावा लागणार नाही. 21 जूनपासून 18 वर्षावरील नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सोमवारी (7 जून) सकाळी नोंदल्या गेलेल्या कोविड रुग्णांचा आकडा गेल्या 45 दिवसांतला सर्वात नीचांकी आकडा आहे. देशभरात 1 लाख 636 नवे कोरोना रुग्ण सापडले. अॅक्टिव्ह केसेसची संख्या 14,01,609 पर्यंत कमी झाली आहे. कोरोना मृत्यूंची संख्या मात्र 2,427 ची भर पडल्याने 3,49,186 वर पोहोचली आहे.
हे ही वाचा-मोदी सरकार निर्णय घेण्याआधीच शरद पवारांनी केला नवा प्लॅन, समिती केली स्थापन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
-कोरोना काळात देशात सर्वाधिक ऑक्सिजनची गरज
-अद्यापही देशातील कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही.
-भारतात लस निर्मिती करणं हे मोठं काम ठरलं आहे.
-आज संपूर्ण जगातव लशींची जी मागणी आहे, त्याच्या तुलनेत उत्पादन करणारे देश आणि लस तयार करणाऱ्या कंपन्या कमी आहेत.
-विचार करा जर भारतात लस निर्मिती झाली नसती तर भारतासारख्या विशाल देशात काय झालं असतं?
-भारतात दोन मेड इन इंडिया लशी तयार करण्यात आल्या, यावरुन भारत इतर देशांच्या तुलनेत कमी नाही.
-कोरोनाला हरवण्यासाठी नियामांचं पालन करणं गरजेचं आहे.
-देशात सात कंपन्या विविध लशींची निर्मिती करीत आहे, तीन लशींचं ट्रायल एडव्हास ट्रॅकवर सुरू आहे.
-देशात नेजल लशींच्या निर्मितीचं काम ट्रायल पातळीवर सुरू आहे.
-देशात 23 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे.
-परदेशातून लस देशात आणण्यावर भर दिला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Corona vaccination, Narendra modi, PM narendra modi, Sanjeevani