Modi 2.0 वेगळा व्हेन्यू, खासा मेन्यू, 60 मंत्री : शपथविधी सोहळ्यासंबंधी माहिती हव्यात अशा 6 गोष्टी

PM Modi Oath-Taking Ceremony नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी दिल्लीत जय्यत तयारी झाली आहे. हा सोहळा ऐतिहासिक ठरणार याला कारण आहेत या 7 गोष्टी.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 04:53 PM IST

Modi 2.0 वेगळा व्हेन्यू, खासा मेन्यू, 60 मंत्री : शपथविधी सोहळ्यासंबंधी माहिती हव्यात अशा 6 गोष्टी

नवी दिल्ली, 30 मे : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी गुरुवारी पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. हा सोहळा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला स्थान असेल, कोणाला डच्चू मिळेल याबरोबरच या सोहळ्याविषयी या 6 गोष्टी माहिती असायलाच हव्यात

1. मोदींचा शपथविधी सोहळा हा मेगा इव्हेंट ठरणार. कारण या कार्यक्रमासाठी तब्बल 8000 पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मुख्य सोहळ्यात मंत्रिपदासाठी 60 खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे म्हणजे 60 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.

2. काही परदेशी पाहुण्यांचाही समावेश आहे.  बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतान या सारख्या देशांच्या प्रमुखांचा पाहुण्यांच्या यादीत समावेश आहे. 14  देशांच्या प्रमुखांना यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि विरोधी पक्षातील नेत्यांना बोलवण्यात आलं आहे.

मोठी बातमी : राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? राहुल-पवार भेट सुरू

सुप्रिया सुळेंना विरोधी पक्षनेते पद मिळणार? दिल्लीत हालचालींना वेग

Loading...

3. कुठे आणि किती वाजता? शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या समोरच्या प्रांगणात होणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या मुख्य इमारतीच्या बाहेर त्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. संध्याकाळी 7 वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल.

4. वेगळा व्हेन्यू : नेहमी शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये होतो. या वेळी तो प्रांगणात होणार आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनीही 1998 मध्येच याच ठिकाण पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. सर्वांत आधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथ घेणारे पंतप्रधान होते चंद्रशेखर.

5. खासा मेन्यू : खास निमंत्रित पाहुण्यांसाठी शपथविधी सोहळ्यानंतर शाही खाना आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्याच्या अगोदर 7 वाजता सर्व निमंत्रितांसाठी हाय टी आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये लेमन टार्ट, राजभोग, समोसा असा शाकाहारी बेत आहे. नंतरच्या गाला डिनरला शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पर्याय असतील.

6. दिग्गजांची उपस्थिती : वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामांकित व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पी. टी उषा, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, सायना नेहवाल, गोपिचंद, दीपा करमाकर अशा क्रीडापटूंसह कंगना रनौट, शाहरुख खान, संजय लीला भन्साळी, करण जोहर या सेलेब्रिटींना निमंत्रित करण्यात आलं आहे. रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, अजय पिरामल यांनाही निमंत्रण गेलं आहे.


मोदींच्या मंत्रिमंडळात धक्कादायक बदल होणार? या 5 गोष्टींबाबत मोठा सस्पेन्स

सर्वांना धक्का देत भाजपकडून मंत्रिपदासाठी नाव, प्रकाश आंबेडकरांना केलं आहे पराभूत

VIDEO: मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी 'या' मंत्र्याने धरले मुलीचे पाय

'या' मंत्र्याचं नव्या यादीत नाव नसल्याने अमित शहांबद्दलचा सस्पेन्स आणखीच वाढला

रावसाहेब दानवेंची मंत्रिपदी वर्णी, कोणतं खातं मिळणार?

शरद पवार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? राहुल गांधींसोबतच्या भेटीचा EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...