#News18RisingIndia -पूर्व भारताच्या विकासावर लक्ष केंद्रीत करणार-पंतप्रधान मोदी

पूर्वी भारतातल्या 13000 गावांमध्ये वीज आणल्याचं काम आपण केलं असल्याचं काम आपण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.तसंच पूर्वी भारत म्हणजे फक्त उत्तरपूर्वेतील सात राज्य नाही तर बिहार , झारखंड ,पश्चिम बंगाल ,ओडीशा ही राज्य देखील असल्याचं त्यांनी सांगितलं.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2018 06:36 PM IST

#News18RisingIndia -पूर्व भारताच्या विकासावर लक्ष केंद्रीत करणार-पंतप्रधान मोदी

19 मार्च :  आपण पूर्वी भारताच्या विकास करत आलो असून यापुढेही पूर्वी भारताच्या विकासावर विशेष लक्ष देणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

News18risingindia समिटमध्ये मोदींनी पत्रकार तसंच इतर उपस्थितांशी संवाद साधला. पूर्वी भारतातल्या 13000 गावांमध्ये वीज आणल्याचं काम आपण केलं असल्याचं काम आपण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.तसंच पूर्वी भारत म्हणजे फक्त उत्तरपूर्वेतील सात राज्य नाही तर बिहार , झारखंड ,पश्चिम बंगाल  ,ओडीशा ही राज्य देखील असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 3 वर्षात आपण पूर्वी भारताचे जवळपास 30 दौरे केले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

विरोधी पक्ष कायमच आपल्यावर  हे सगळं फक्त मतांच्या राजकारणासाठी करत असल्याची टीका करत असतात पण त्यांना तिथे झालेल्या बदलांचं वास्तव माहित नसल्याचं पंतप्रधानांनी साांगितलं. मताच्या राजकारणासाठी नाहीतर पश्चिम भारताच्या तुलनेत पूर्व भारत विकासात प्रचंड मागे आहे. त्याच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी आपण हे करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आताच पूर्वी उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर आणि फुलपूर .या  खासदारकीच्या जागांवर झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता.  उत्तर पूर्वी भारतात भाजपला लोकसभेत 24 पैकी फक्त 10 जागा स्वबळावर मिळवत्या आल्या आहे. गेल्या 4 वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये पूर्वोत्तरी भारतातल्या सात पैकी 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. याशिवाय आरोग्य क्षेत्रावर आपण भर देत असल्याचंही त्यांनी सांगितलं .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2018 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close