VIDEO : मोदी म्हणतात, 'गाय आणि 'ॐ' असं ऐकल्यावर काही लोकांचे कान टवकारतात'

काही लोकांच्या कानावर गाय हा शब्द जरी पडला तरी त्यांचे कान टवकारले जातात. त्यांना करंट लागतो, अशा शब्दांत पंतप्रधानांनी पशुधनाचं महत्त्व जाणून न घेणाऱ्यांना टोले मारले.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 04:49 PM IST

VIDEO : मोदी म्हणतात, 'गाय आणि 'ॐ' असं ऐकल्यावर काही लोकांचे कान टवकारतात'

मथुरा, 11 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मथुरामधल्या व्हेटर्नरी युनिव्हर्सिटीमधल्या एका उपक्रमाचं उद्धघाटन केलं. त्यावेळी ते म्हणाले, काही लोकांच्या कानावर गाय हा शब्द जरी पडला तरी त्यांचे कान टवकारले जातात. त्यांना करंट लागतो. लगेचच त्यांना वाटतं की देश 16 व्या किंवा 17 व्या शतकात गेला आहे. अशा लोकांनीच देश बरबाद केला आहे.

मथुरेच्या कृष्णाच्या भूमीने अवघ्या जगाला मानवतेचा संदेश दिला आहे. आज अखिल विश्व पर्यावरणाच्या संरक्षणाचा आदर्श शोधतं आहे पण भगवान कृष्ण हा भारताचा प्रेरणास्रोत आहे, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. कृष्णाची कल्पना पर्यावरण प्रेमाशिवाय अधुरी आहे. निसर्ग, पर्यावरण आणि पशुधन हा नेहमीच भारताच्या आर्थिक चिंतनाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे, असंही ते म्हणाले.

Loading...

देशातलं पशुधन राखण्यासाठी सरकारने एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. FMD म्हणजेच फूट अँड माउथ डिसीज या रोगाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने 13 हजार कोटींच्या एका मोहिमेची सुरुवात केली आहे. यामध्ये गायी, म्हशी, बकऱ्या आणि डुकरांचं लसीकरण करण्यात येणार आहे.

शशी थरूर यांचा इंग्रजीत 'राडा'; युजर्स म्हणतात, कहना क्या चाहते हो?

स्वच्छ भारत, जल जीवन मिशन आणि कृषी, पशुपालनाचा प्रोत्साहन याच धोरणाच्या आधारे आपण सशक्त आणि समृद्ध भारत बनवण्याकडे वाटचाल करत आहोत. गेल्या 5 वर्षांत देशातल्या दूध उत्पादनात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही 13 टक्क्यांची वाढ झाली आहे, असंही पंतप्रधान म्हणाले.

========================================================================

VIDEO : भाजप प्रवेशाआधी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 03:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...