• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण

भाजपला मित्रपक्षांसोबत सरकार चालवण्याचा अनुभव असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 मे : देशात सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सहकारी, मित्र पक्षांना एकत्र घेत सरकार चालवण्याचा अनुभव भाजपला आहे.  मी यापूर्वी पक्षाच्या कामासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये इतर पक्षासोबत काम केलं आहे. शिवाय, आम्हाला अटलबिहारी वाजपेयी यांचा वारसा लाभला आहे. त्यांच्या काळात मित्र पक्षांसोबत यशस्वीपणे सरकार चालवलं गेलं होतं. असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सट्टा बाजारात कुणाची हवा? बहुमत न मिळाल्यास कोण करणार मोदींना मदत? विरोधकांवर टीका यावेळी नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर देखील टीकास्त्र डागलं. खासकरून उत्तर प्रदेशातील सपा – बसपाच्या महागठबंधनचा समाचार घेत राजकीय फायदयासाठी 'महागठबंधन' नाही तर 'महामिलावट' असल्याची टीका केली. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास शबाना आझमी देश सोडणार? काय आहे सत्य? 2014 प्रमाणे यश मिळेल यावेळी भाजपसह मित्रपक्षांना 2014 प्रमाणे यश मिळेल असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसंच मित्रपक्षांची कामगिरी देखील दमदार असेल अशी प्रतिक्रिया देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. यापूर्वी देखील इतर पक्षांसाठी मैत्रिचे दरवाजे उघडे असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. देशाच्या विकासासाठी मित्रपक्षांना एकत्र घेत कशा पद्धतीनं सरकार चालवायचं याचा वारसा भाजपला अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून मिळालेला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यावरून तर्क - वितर्कांना सुरूवात झाली आहे. VIDEO : 'काँग्रेसच्या 70 वर्षांच्या सत्तेत कुणालाच न्याय मिळाला नाही'
  First published: