CAB विरोधातल्या हिंसाचाराला काँग्रेसच जबाबदार, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

CAB विरोधातल्या हिंसाचाराला काँग्रेसच जबाबदार, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

'जे लोक आगी लावत आहेत त्यांच्या कपड्यांवरूनच ते कोण आहेत हे कळून येतं जास्त सांगायची गरज नाही.'

  • Share this:

रांची 15 डिसेंबर : संसदेत मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात आता भडका उडालाय. पूर्वोत्तरेतल्या राज्यानंतर आता उत्तरेतल्या राज्यांमध्येही असंतोष उफाळलाय. राजधानी दिल्लीत रविवारी तीव्र निदर्शने करण्यात आलीय. या असंतोषावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता आपलं मौन सोडलंय. देशभर जो असंतोष आहे त्यामागे कोण आहे हे माहित आहे. लोकांच्या भावना भडकविण्यासाठी काँग्रेसनेच चिथावणी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. झारखंडमधल्या दुमका इथं एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. जे लोक आगी लावत आहेत त्यांच्या कपड्यांवरूनच ते कोण आहेत हे कळून येतं जास्त सांगायची गरज नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसने या विधेयकाविरोधात भूमिका घेतली होती. त्याचबरोबर काँग्रेसच्या काही नेत्यांनी या विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केली होती.

CABच्या विरोधात दिल्लीत भडका, आंदोलकांनी पेटवल्या तीन बसेस

राजधानी दिल्लीत रविवारी तीव्र निदर्शने करण्यात आलीय. दिल्लीतल्या जामिया भागात गेल्या काही दिवसांपासून निदर्शने सुरू होती. रविवारी तरुण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निदर्शनांना सुरुवात केली. यावेळी संतप्त तरुणांनी 3 बसेसना आगी लावल्या. त्याआधीही जामिया मिल्लिया इस्लामिया (Jamia Millia Islamia)च्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात तीव्र निदर्शने केली होती.  जामिया मिल्लिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने हे शांततापूर्ण मार्गाने होत असल्याचं सांगितलं. मात्र परिस्थिती तशी नसल्याचं पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झालं. निदर्शनांमुळे अनेक रस्ते बदं केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. शुक्रवारी तरुणांनी संसद भवनावरच मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी लाठीहल्लाही केला होता.

उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी फडणवीस वापरणार 'हे' अस्त्र!

शनिवारी संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगालमध्येही या विधेयकाविरोधात निदर्शने करण्यात येत असून मोठा भडका उडाला आहे. मुर्शिदाबाद जवळच्या कृष्णापोरे रेल्वे स्टेशनवर उभी असलेली एक रिकामी गाडीच पेटवून दिली. तर बेलडांगा हे रेल्वे स्टेशनलाही आग लावली. 200 ते 300 लोकांचा संतप्त जमाव निदर्शने करत होता. हा जवाम अनियंत्रित झाला आणि त्यांनी रेल्वे आणि रेल्वे स्टेशन पेटवून दिलं. सुदैवाने ट्रेनमध्ये कोणी नव्हतं त्यामुळे मोठी जिवित हानी टळली गेली. या आगीमुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकारवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षादलाला तैनात करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 08:35 PM IST

ताज्या बातम्या