पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला हा पहिला निर्णय...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला हा पहिला निर्णय...

नरेंद्र मोदी सरकारचा शपथविधी आणि खातेवाटप झाल्यानंतर आता नव्या जोमाने या सरकारचं काम सुरू झालं आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान या नात्याने त्यांनी घेतलेला हा पहिला निर्णय आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,31 मे : नरेंद्र मोदी सरकारचा शपथविधी आणि खातेवाटप झाल्यानंतर आता नव्या जोमाने या सरकारचं काम सुरू झालं आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आता शहीद जवानांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे.

राष्ट्रीय संरक्षण निधीअंतर्गत ही स्कॉलरशिप शहीद जवान आणि अधिकाऱ्यांच्या मुलांना दिली जाते. याला पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना असं म्हणतात. आता ही स्कॉलरशिप मुलांसाठी 2 हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये करण्यात आली आहे. मुलींची स्कॉलरशिप 2 हजार 250 रुपयांवरून तीन हजार रुपये करण्यात आली आहे.


Loading...


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बदलाला मंजुरी दिली आणि पंतप्रधान म्हणून पहिली सही केली. मोदी सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत नितिन गडकरी, राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी यांच्यासह ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.या कॅबिनेट बैठकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या साउथ ब्लॉकमधल्या कार्यालयात महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांना अभिवादन केलं. शपथविधी आणि खातेवाटपानंतर आता मोदींची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. या सरकारकडून जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत.आता मोदींचं हे सरकार जनतेच्या अपेक्षा कशा पूर्ण करतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

==========================================================================================

VIDEO : 'तिच्या अंगात हे बळ कुठून आलं, हा मलाही प्रश्न पडला'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...