'दहशतवाद्यांनो...तुम्ही खूप मोठी चूक केली आहे', हल्ल्यानंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

'दहशतवाद्यांनो...तुम्ही खूप मोठी चूक केली आहे', हल्ल्यानंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : 'तुम्ही खूप मोठी चूक केली आहे,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी संघटनांना इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

-पंतप्रधान मोदींकडून शहिदांना श्रद्धांजली

-दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं रक्त उसळत आहे, याची मला जाणीव

-मला आपल्या सैनिकांच्या शौऱ्यावर पूर्ण विश्वास

-तुम्ही खूप मोठी चूक केली आहे, दहशतवादी संघटनांना मोदींचा इशारा

-दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्याचा परिणाम भोगावा लागणार

या कुरापतींनी आणि भ्याड हल्ल्याने भारतात अस्थिरता पसरेल असं शेजारी देशाला वाटत असेल तर चुकीचं असल्यांच पंतप्रधान मोदी म्हणाले. ज्या वाटेने तुम्ही चालला आहात तो उद्ध्वस्त करणारा रस्ता असून याचे सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. या हल्ल्याचा अनेक देशांनी निषेध केला असून भारतासोबत असल्याचे म्हटले आहे. सर्व देशांनी दहशतवाद्यांविरोधात एकत्र येण्याची गरज आहे.

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ला :

पुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.या घटनेनंतर पुलवामा येथे असलेल्या सर्व जवानांना, राज्य पोलीस दल आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतिपोरा येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. तसेच परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. राज्यातील पुलवामा, शोपियां, कुलग्राम आणि श्रीनगर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीरमधील हा गेल्या तीस वर्षांतला सर्वात मोठा मानला जात आहे.


VIDEO : हाऊ इज द जोश? आता खरा जोश दाखवा : शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2019 11:07 AM IST

ताज्या बातम्या