Home /News /national /

रायफल उचलून पंतप्रधानांनी केलं शूट, पाहा पहिल्यांदाच फायरिंग करतानाचा मोदींचा VIDEO

रायफल उचलून पंतप्रधानांनी केलं शूट, पाहा पहिल्यांदाच फायरिंग करतानाचा मोदींचा VIDEO

डिफेन्स एक्सपोमध्ये पंतप्रधान मोदींनी आधुनिक शस्त्रांची पाहणी केली. यावेळी मोदींनी व्हर्चुअल शूटिंग रेंजमध्ये निशाणाही लावला.

    लखनऊ, 05 फेब्रुवारी : लखनऊमध्ये सुरु झालेल्या डिफेन्स एक्सपोमध्ये पंतप्रधान मोदींना हातात रायफल घ्यावी लागली आहे. इतकंच नाही तर, मोदींनी शूट देखील केलं. संरक्षण सज्जता दाखवणारं प्रदर्शन उत्तर प्रदेशात लखनौला सुरू आहे. या प्रदर्शनात पंतप्रधानांनी हजेरी लावली. डिफेन्स एक्स्पोमध्ये पंतप्रधान मोदींनी आधुनिक शस्त्रांची पाहणी केली. यावेळी मोदींनी आधुनिक शस्त्रांनी व्हर्चुअल शूटिंग रेंजमध्ये निशाणाही लावला. एक्सपोमध्ये उपस्थित तज्ज्ञांनी मोदींना यावेळी आधुनिक शस्त्रांची माहिती दिली. त्यांनंर मोदींनी व्हर्चुअल शुटिंग रेंजमध्ये गोळ्या फायर केल्या.  व्हर्चुअल शुटिंग रेंज विज्ञानाची अशी एक किमया ज्यामध्ये तुम्ही गोळ्या वाया न घालवता निशाणा साधू शकता. सोबतच तुम्हाला तुमची क्षमताही यावेळी समजते. पंतप्रधान मोदींनी उचचली रायफल पंतप्रधान मोदींनी व्हर्चुअल शुटिंग रेंजमध्ये हजेरी लावली. व्हर्चुअल शुटिंग रेंजमध्ये नेमबाजाला युद्धभूमीवर असल्याचा थरार अनुभवता येतो. यामुळे सैनिकांना युद्धकौशल्य अधिक चांगल्या पद्धतीने शिकता येतात. युद्धभूमीवरचा थरार पंतप्रधान मोदींनीही अनुभवला. मोदींनी रायफल उचलली. यावेळी त्यांनी निशाणा लावत फायरही केली. भारत स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करत असल्याचा मला अभिमान आहे, अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या. ‘तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर, दहशतवाद, सायबर क्राईम यांना रोखणे विश्वासाठी आव्हान  आहे. या आव्हानांना पाहता सर्वच देश नव-नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. यामध्ये भारतही मागे नसल्याचं’, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं. ---------------- अन्य बातम्या सुप्रीम कोर्टाची पूजा व्हावी, राम मंदिर मुद्यावरून संजय राऊतांचा मोदींवर निशाणा बाळासाहेबांना 'भारतरत्न' द्या! मोदींच्या मंदिराच्या घोषणेनंतर तोगडियांचा एल्गार ही बाई बावळट, वर्धा जळीत प्रकरणी भाजप-राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांमध्ये जुंपली
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: BJP, Pm modi

    पुढील बातम्या