VIDEO साध्वींवर संतापले मोदी; नथुरामबद्दलच्या वक्तव्यावर दिली पहिली प्रतिक्रिया

VIDEO साध्वींवर संतापले मोदी; नथुरामबद्दलच्या वक्तव्यावर दिली पहिली प्रतिक्रिया

साध्वींच्या वक्तव्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच उघडपणे सांगितलं. काय म्हणाले मोदी पाहा व्हिडिओ

  • Share this:

खरगोन (मध्य प्रदेश), 17  मे : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे खरे देशभक्त होते, असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर साध्वींवर सर्व थरांतून टीका झाली. साध्वी प्रज्ञा यांनी त्यानंतर माफीदेखील मागितली. या सगळ्या प्रकाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच उघडपणे बोलले आहेत. इथल्या प्रचारसभेमध्ये एका स्थानिक न्यूज चॅनेलच्या पत्रकाराशी बोलताना त्यांनी साध्वींच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं ते सांगितलं.

नथुराम गोडसेमुळे भाजपच्या अडचणीत वाढ; अमित शहांनी घेतली दखल

SPECIAL REPORT : वाचाळवीर झाले भाजपला रोगापेक्षा इलाज भयंकर!

साध्वींच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं मोदींना विचारलं असता ते म्हणाले, "हे वक्तव्य घृणास्पद आहे. कुठल्याही सभ्य समाजात अशा प्रकारची वक्तव्य सहन केली जाऊ शकत नाहीत. गांधीजींबद्दल असं काही बोलणं निषेधार्थच आहे. साध्वी प्रज्ञा यांनी झाल्या प्रकारची माफी मागितली हे खरं. पण मी मनापासून त्यांना माफ करू शकणार नाही."

साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काल माफी मागितली. भाजपनेसुद्धा हे वक्तव्य त्यांचं वैयक्तिक असल्याचं स्पष्ट करत हात झटकले. या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नाही, असं ट्वीट अमित शहा यांनीसुद्धा केलं.

First published: May 17, 2019, 3:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading