सुर्योस्ताला सुर्याचा रंग लाल होतो आणि सुर्योदयाला केशरी -पंतप्रधान मोदी

"काही दिवसांनंतर काँग्रेसचे नेते म्हणतील एक काळ होता तेव्हा आमचं सरकार होतं, आमचे मुख्यमंत्री होते, आमचा पंतप्रधान होता. काँग्रेसवर अशी वेळ आली "

Sachin Salve | Updated On: Mar 3, 2018 08:57 PM IST

सुर्योस्ताला सुर्याचा रंग लाल होतो आणि सुर्योदयाला केशरी -पंतप्रधान मोदी

03 मार्च : सुर्यास्त होत असतो तेव्हा सुर्याचा रंग हा लाल असतो आणि जेव्हा सुर्योदय होत असतो तेव्हा केसरी असतो. काल धुळवडीत सर्व रंग उधळलेत पण आज फक्त केसरी रंग दिसतोय असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या ऐतिहासिक विजयावर आनंद व्यक्त केला.

डाव्यांच्या गडाला खिंडार पाडून त्रिपुरात भाजपचा झेंडा फडकलाय. या विजयानंतर दिल्ली मुख्यालयात भाजपची विजयी सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदींनी जोरदार भाषण केलं.

राजकारणात विजय आणि पराभव होतच असतो हीच गोष्ट लोकशाहीतली सुंदर बाब आहे. विजयाचा आनंद आम्ही साजरा करूच पण राजकीय पक्षांनी पराभव स्विकारला पाहिजे असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला. ही लोकशाहीची ताकद आहे. गरीब जनतेनं डाव्यांनी केलेल्या अन्यायाला वोटने उत्तर दिलंय. आम्हाला आमचे कार्यकर्ते गमावावे लागले पण याच दु:ख सर्वात जास्त त्रिपुराच्या लोकांना आहे असंही यावेळी मोदी म्हणाले.

काही दिवसांनंतर काँग्रेसचे नेते म्हणतील एक काळ होता तेव्हा आमचं सरकार होतं, आमचे मुख्यमंत्री होते, आमचा पंतप्रधान होता. काँग्रेसवर अशी वेळ आली की त्यांचा पक्ष आता छोटा झालाय. एका पक्षात एक अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वाखाली एक पक्ष सतत विजयी होत आहे आणि तर एका असा पक्ष आहे तिथे लोकं अध्यक्ष होतायत पण त्यांची उंची मात्र कमीच राहतेय असं म्हणत त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख टाळत टोला लगावला.

आमचे काही उमेदवार हे असे होते की त्यांचं वय 25 वर्षांपेक्षा कमी होतं. अर्ज बाद होण्याची भीती होती तेव्हा आम्हाला त्यांचं जन्माचा दाखला तपासावा लागला पण आता त्यांनी लोकांची मन जिंकून विजयी झाले आहेत असंही मोदी म्हणाले.

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांचं भाषण सुरू असताना नजीकच एका मश्जिदीत अजान सुरू झाली त्यावेळी मोदींनी आपलं भाषण थांबवलं आणि जेव्हा अजान सुरू झाली तेव्हा पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2018 08:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close