भाजप अध्यक्षपदी नड्डांच्या निवडीनंतर पंतप्रधान मोदींचे विरोधकांना टोमणे

भाजप अध्यक्षपदी नड्डांच्या निवडीनंतर पंतप्रधान मोदींचे विरोधकांना टोमणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी अध्यक्ष अमित शहांवर स्तुतिसुमनं उधळली आणि नड्डांच्या निवडीवर विश्वास व्यक्त केला. आपण ज्या तत्त्वांनुसार आणि विचारांनी चालतो ती काही लोकांना आवडत नाहीत, असं सांगत मोदींनी विरोधकांचा हा प्रॉब्लेम सांगितला.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जानेवारी : भारतीय जनता पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांची बिनविरोध निवड झाली. पक्षाच्या नव्या अध्यक्षांचं अभिनंदन करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी अध्यक्ष अमित शहांवर स्तुतिसुमनं उधळली आणि नड्डांच्या निवडीवर विश्वास व्यक्त केला. नड्डा हे 2022 पर्यंत भाजपचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. यावेळी बोलताना मोदींनी विरोधकांवर ताशेरे ओढले. आपण ज्या तत्त्वांनुसार आणि विचारांनी चालतो ती काही लोकांना आवडत नाहीत. आपण काहीतरी चुकीचं करतोय हा आपला प्रॉब्लेम नसून या देशातली बहुतांश जनता आपल्याला आशीर्वाद देते आहे, हा खरा प्रॉब्लेम आहे. म्हणूनच आपल्याला त्यांची टीका सहन करावी लागते. ज्या लोकांना निवडणुकीत नाकारलं गेलं आहे, त्यांच्याकडे आता आपल्याशी लढायला शस्त्रच उरलेली नाहीत. म्हणून मग चुकीची माहिती पसरवण्याचा उद्योग ते करतात, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर टीका केली.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. नड्डा हे 2022 पर्यंत भाजपचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवड ही सर्व सहमतीने आणि कोणत्या लढतीविना बिनविरोध होण्याची परंपरा आहे.

संबंधित - मोदी आणि शहांचे विश्वासपात्र कोण आहेत जे.पी नड्डा?

यावेळीही हीच परंपरा कायम राखली जाणार आहे. नवीन अध्यक्षाच्या निवडीसह पक्षातील मागील अध्यक्ष अमित शहा यांच्या साडेपाच वर्षांपेक्षाचा कार्यकाळ संपुष्टात येईल. शहा यांचा कार्यकाळ हा निवडणुकांसाठी सर्वात चांगला कार्यकाळ होता. त्यांच्याबद्दल बोलायला आपल्याकडे शब्दच नाहीत, अशा शब्दांत मोदींनी शाहांचं कौतुक केलं.

भाजप कार्यकारिणीची रविवारी बैठक झाली. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत, धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकूर, यूपी भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव यांच्यासह अन्य मोठे नेते हजर होते. जेपी नड्डा यांची राजकीय सुरुवात ही महाविद्यालयीन राजकारणापासून सुरू झाली. अनेक वर्षांपासून त्यांना संघटनेचा अनुभव आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले नड्डा यांची संघाशीही (RSS) त्यांची चांगली जवळीक आहे.

First published: January 20, 2020, 5:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading