इमरान खान यांची पोल खोल; 'मोदी फोन घेत नाहीत, अन्य देशांकडून सन्मान नाही'

मोदींनी शपथविधी कार्यक्रमापासून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना दूर ठेवले.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 12:13 PM IST

इमरान खान यांची पोल खोल; 'मोदी फोन घेत नाहीत, अन्य देशांकडून सन्मान नाही'

नवी दिल्ली, 30 मे: नरेंद्र मोदी गुरुवारी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. याआधी 2014मध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती तेव्हा मोदींनी दक्षिण आशियातील (SAARC) देशांच्या प्रमुखांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा देखील समवेश होता. पण त्यानंतर पाच वर्षांनी आज होणाऱ्या कार्यक्रमासाठी मात्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना दूर ठेवले आहे. यासंदर्भात पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नवाझ शरीफ यांच्या मुलीने मंगळवारी इमरान खान यांच्यावर हल्ला चढवला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या पंतप्रधान इमरान खान यांना सन्मान देत नाहीत. फेब्रुवारी महिन्यात इमरान खान यांनी मोदींनी फोन केला होता पण त्यांनी तो उचलला नाही. लाहोरमधील मॉडल टाऊन येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. तेव्हा इमरान यांनी तक्रार देखील केली होती की भारताचे पंतप्रधान माझा फोन उचलत नाहीत. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. त्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला थडा शिकवला होता.

अन्य देश देखील देत नाहीत सन्मान

मोदी आणि अन्य देशाचे प्रमुख इम्रान यांना का सन्मान देत नाहीत असा सवाल मरियम यांनी विचारला. दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर तुम्ही चालता असा टोला त्यांनी इमरान यांना लगावला. फेब्रुवारी महिन्यात पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40हून अधिक जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्रईक केला होता. या काळात दोन्ही देशातील तणाव प्रचंड वाढला होता.

मोदी या नेत्याला म्हणतात मित्र...

Loading...

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान दुसऱ्याच्या हातातील बाहुले आहेत. जगात तुम्हाला कोणीही सन्मान देत नाहीत, असे सांगत मरियम यांनी मोदींनी शरीफ यांचा मित्र असा उल्लेख केला होता.


VIDEO: उद्धव ठाकरेंकडून मंत्रिपदासाठी 'या' एकमेव व्यक्तीच्या नावाची शिफारस


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 11:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...