पाकची वकिली करणाऱ्या तुर्कस्तानला PM मोदींचा दणका

पाकची वकिली करणाऱ्या तुर्कस्तानला PM मोदींचा दणका

संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या तुर्कस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कूटनिती वापरून इशारा दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीर मुद्यावरून पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या तुर्कस्तानला भारतानं दणक दिला. जगातील बहुसंख्य देशांकडूनं भारताला समर्थन दिलं जात असताना तुर्कस्तानकडून वारंवार पाकिस्तानचे गोडवे गायले जात आहेत. संयुक्त राष्ट्रसंघातही तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांनी पाकिस्तानच्या तोंडची भाषा बोलली. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुर्कीच्या शेजारी देशांसोबतचे आपले संबंध मजबूत केले आहेत. त्यांच्या या कूटनितीमुळे अप्रत्यक्ष तुर्कस्तानला इशारा मिळाला आहे.

तुर्कस्तानच्या शेजारी देशांपैकी एक असलेल्या सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधान मोदींनी चर्चा केली. तुर्कस्तान आणि सायप्रस यांच्यात 1974 पासून वाद आहे. तिथंही सायप्रसच्या स्वातंत्र्य, अखंडता आणि स्वायत्तता यावर मोदींनी भर दिला. ही बाब तुर्कीसाठी अडचणीची ठरणारी आहे. तुर्कस्तान स्वत:ला भारताचे मित्रराष्ट्र संबोधतात पण संयुक्त राष्ट्रसंघात एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाला विरोध केला होता.

मोदींनी ग्रीस आणि आर्मेनिया या देशांच्या नेत्यांसोबत चर्चा केली. या दोन्ही देशांसोबत तुर्कस्तानचा वाद आहे. समुद्रातील हद्दीमुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. तर आर्मेनियाच्या लाखो नागरिकांना तुर्कीने ठार केल्याचा आरोप आहे. यामुळे या देशांमध्ये नेहमीच वाद होतात.

आर्मेनिया आणि सायप्रस यांच्याविरुद्ध तुर्कस्तानचे शत्रूत्व एक शतकापासून आहे. 1915 ते 1918 च्या काळात तुर्कस्तानने आर्मेनियात नरसंहार घडवला होता. यामध्ये जवळपास 15 लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या या तिनही देशांच्या प्रमुखांसोबत चर्चेचा उद्देश तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना इशारा देणं हा होता. काश्मीर हा मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आहे. यात तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही असेही मोदींनी याआधी स्पष्ट केलं होतं.

काश्मीरमधील ओसामा ठार; महिला कमांडरने केली कारवाई, ऑपरेशनचा VIDEO समोर

Published by: Suraj Yadav
First published: September 29, 2019, 11:26 AM IST
Tags: pm modi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading